Eco friendly bappa Competition
घर ताज्या घडामोडी एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमागे भाजपचाच हात, आमदारांशी चर्चा करतानाचा व्हिडिओ व्हायरल

एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमागे भाजपचाच हात, आमदारांशी चर्चा करतानाचा व्हिडिओ व्हायरल

Subscribe

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेसोबत बंडखोरी केल्यानंतर त्यांची पुढची रणनिती काय असणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागलं होतं. मात्र, आता समोर आलेल्या व्हिडिओनुसार एकनाथ शिंदे यांच्या या बंडखोरीच्या मागे भाजपच असल्याचं स्पष्ट झालं आहे. शिंदे यांचा बंडखोर आमदारांशी चर्चा करतानाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला असून यात ते राष्ट्रीय पक्षाचा पाठिंबा असून ते आपल्याला काहीच कमी पडू देणार नाही, असं म्हणताना दिसत आहेत. तसेच, या बैठकीत निर्णयाचे सर्वाधिकार हे आमदारांनी गटनेते एकनाथ शिंदे यांना दिल्याचे जाहीर केले आहे.

हेही वाचा – ज्यांनी आमदार केलं त्यांच्याशी गद्दारी नाहीच, सूरत सुटकेची कैलास पाटलांनी सांगितली आपबिती

- Advertisement -

ते पुढे म्हणत आहेत की, आपली सर्व सुख-दुःख सारखीच असून काही असेल तर आपण एकजुटीने करायचं आहे, असं एकनाथ शिंदे व्हिडिओमध्ये आमदारांना सांगताना दिसत आहेत.

शिंदे ज्या राष्ट्रीय पक्षाबद्दल आमदारांना सांगत आहेत तो भाजपच असल्याचा दावा करण्यात येत आहे. यादरम्यान, भाजपच्या गोटातही हालचालींना वेग आला असून विरोदी पक्ष नेते देवेंद्र फडणवीसही तातडीने दिल्लीला रवाना झाले आहेत. तेथे ते गृहमंत्री अमित शहा, जे.पी नड्डी यांच्याशी सद्य परिस्थितीवर चर्चा करणार असल्याचं कळते आहे.

- Advertisement -


आणखी वाचा

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -