घरमहाराष्ट्रपुणेअजित पवार यांचा उत्साही कार्यकर्ता..., पुण्यातील बॅनरने चर्चांना उधाण

अजित पवार यांचा उत्साही कार्यकर्ता…, पुण्यातील बॅनरने चर्चांना उधाण

Subscribe

जीवात जीव असे पर्यंत राष्ट्रवादीमध्ये राहणार असल्याचे सांगत अजित पवार यांनी त्यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांवर पडदा टाकला होता. पण आता अजित पवार यांच्या एका उत्साही कार्यकर्त्यामुळे या चर्चांना पुन्हा एकदा सुरूवात झाल्याचे पाहायला मिळत आहे.

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकारण हे अजित पवार यांच्याच अवतीभवती फिरत असल्याचे दिसून येत आहे. अजित पवार हे लवकरच भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू होती. पण जीवात जीव असे पर्यंत राष्ट्रवादीमध्ये राहणार असल्याचे सांगत अजित पवार यांनी या चर्चांवर पडदा टाकला खरा. पण आता अजित पवार यांच्या एका उत्साही कार्यकर्त्यामुळे या चर्चांना पुन्हा एकदा सुरूवात झाल्याचे पाहायला मिळत आहे.

अजित पवार यांच्या पुण्यातील पिंपरी-चिंचवडमधील एका कार्यकर्त्याने त्यांच्याशी संबंधीत बॅनर परिसरात झळकवले. “दादा आम्ही तुमच्यासोबत आज, उद्या आणि सदैव” असा मजकूर या बॅनरवर लिहिण्यात आलेला आहे. पण या बॅनरवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उल्लेख आणि महत्त्वाचे म्हणजे शरद पवार यांचा फोटो लावण्यात आलेला नाही. त्यामुळे अजित पवार यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांना राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा सुरूवात झाली आहे. तर संपूर्ण शहरात सध्या हे बॅनर लोकांच्या चर्चेचा विषय बनले आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – राऊतांना कंटाळूनच अजित पवार मविआ सोडतील, भाजपा खासदाराची टीका

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सध्या काहीच आलबेल नसल्याचे दिसून येत आहे. कारण अचानकपणे अजित पवार यांचे नॉट रिचेबल होणे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यक्रमाला गैरहजर राहणे, शिंदे-फडणवीस सरकार कशा पद्धतीने स्थिर राहील याबाबत माहिती देणे, ईव्हीएमचे समर्थन करणे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामाची प्रशंसा करणे अशा विविध कारणास्तव ते भाजपामध्ये जाणार असल्याचे ठोकताळे बांधण्यात आले होते. मात्र अजित पवारांनी पत्रकार परिषद घेऊन ही शक्यता फेटाळत, या चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला. शरद पवार यांनी आपली कन्या सुप्रिया सुळे आणि खासदार संजय राऊत यांच्या मदतीने केलेल्या कोंडीमुळे अजित पवार यांचे भाजपाप्रवेशाचे मनसुबे धुळीस मिळाले आहेत, असे बोलले जात आहे. पण शेवटी अजित पवार यांचा राजकारणात स्वतःचा असा एक दबदबा असल्याने येत्या काही काळात त्यांचा भाजपमध्ये प्रवेश झाल्यास आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही, असे देखील बोलले जात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -