घरताज्या घडामोडीदिल्लीतील प्रदुषण वाढण्यासाठी भाजपच्या लोकांनी फटाके फोडले, पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप

दिल्लीतील प्रदुषण वाढण्यासाठी भाजपच्या लोकांनी फटाके फोडले, पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप

Subscribe

देशाची राजधानी असलेल्या दिल्लीमध्ये वायु प्रदुषणाचे नेहमी संकट असते. दिल्लीतील वातवरण प्रदुषित झाल्यामुळे कधी धुके तर कधी नद्या फेसाळलेल्या दिसतात. मात्र दिल्लीच्या पर्यावरण मंत्र्यांनी वायू प्रदुषणासाठी भाजपचे लोकं जबाबदार असल्याचा गंभीर आरोप केला आहे. भाजपच्या लोकांनी हवेची गुणवत्ता खराब करण्यासाठी मुद्दाम फटाके आणि धूर करणारे फटाके फोडल्यामुळे वायू प्रदुषण झाले असल्याचा आरोप दिल्लीचे पर्यावरण मंत्री गोपाल राय यांनी केला आहे. दिल्लीत शुक्रवारी सकाळी हवेची गुणवत्ता घसरली होती यामुळे सकाळी उशीरापर्यंत धूसर वातावरण होते.

दिल्लीच्या पर्यावरण मंत्र्यांनी वायु प्रदुषणासाठी थेट आता भाजपलाच जबाबदार धरलं असल्यामुळे दिल्लीतील राजकीय वातावरण चांगलच तापलं आहे. शुक्रवारी दिल्लीतील वातावरण दूषित झाल्याचे पाहायला मिळाले. सकाळी उशीरापर्यत हवेत धूराचे साम्राज्य होते. यावर पर्यावरण मंत्र्यानी वक्तव्य केल आहे की, दिवाळीमध्ये जाणूनबूजुन भाजपच्या लोकांनी फटाके फोडले असल्यामुळे हवा दूषित झाली आहे. फटाके न फोडण्याचे आवाहन राज्य सरकारद्वारे करण्यात आले होते. यामुळे नागरिकांनी जास्त प्रमाणात फटाके फोडले नाही परंतु भाजपच्या काही लोकांनी फटाके फोडले जास्त प्रमाणात फोडले आहेत.

- Advertisement -

तसेच पर्यावरण मंत्री गोपाल राय म्हणाले की, शेतातील उर्वरित गवत जाळल्यामुळे देखील वायू प्रदूषणात वाढ झाली आहे. पंजापबमध्ये शेतीची कामे लांबली आहेत. यामुळे शेतकऱ्यांनी ही कामे लवकर उरकण्यासाठी मोठ्या प्रमाणात शेातातील उर्वरित गवत लवकरात लवकर जाळण्याची सुरुवात केली आहे. यामुळे तो धूर दिल्लीच्या दिशेने येत असून वायू प्रदूषण वाढत असल्याचेही पर्यावरण मंत्री गोपाल राय यांनी म्हटलं आहे.

प्रदुषित वातावरणामुळे नागरिकांना आरोग्याच्या समस्या

गुरुवारी रात्री फटाके मोठ्या प्रमाणात फोडल्यामुळे दिल्लीतील नागरिकांना आरोग्यासंबंधी समस्यांना सामोरे जावे लागले. हवेतील गुणवत्ता घसरल्यामुळे सकाळी वातवारण धरकट होते. यामुळे नागरिकांना श्वास घेण्यास अडथळा येत होता तर घशामध्ये जळजळ आणि डोळ्यांमधून पाणी सुटण्यासारख्या समस्या उद्भवल्या आहेत.

- Advertisement -

हेही वाचा : VIDEO: छत्तीसगढच्या मुख्यमंत्र्यांना दिले चाबकाचे फटके, नक्की काय आहे प्रकरण जाणून घ्या

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -