घरताज्या घडामोडीVIDEO: छत्तीसगढच्या मुख्यमंत्र्यांना दिले चाबकाचे फटके, नक्की काय आहे प्रकरण जाणून घ्या

VIDEO: छत्तीसगढच्या मुख्यमंत्र्यांना दिले चाबकाचे फटके, नक्की काय आहे प्रकरण जाणून घ्या

Subscribe

छत्तीसगढचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी दरवर्षीप्रमाणे यंदाही चाबकाचा फटका सहन केला आहे. राज्याच्या सुखासाठी, समृ्द्धी आणि मंगलकार्यासाठी तसेच विघ्नांचा नाश करण्यासाठी चाबकाच्या फटक्यांचा प्रहार सहन केला आहे. बघेल यांनी शुक्रवारी गोवर्धन पूजेदरम्यान ही प्रथा पार पाडली आहे. दुर्ग जिल्ह्यातील ग्राम जंजगिरीमध्ये मुख्यमंत्र्यांनी प्रथा पार पाडली. याच गावातील स्थानिक बीरेंद्र ठाकुरने मुख्यमंत्र्यांना चाबकाचे फटके दिले आहेत. आपल्या देशात अनेक प्रथा आणि परंपरा आहेत. देशात ५० मैलावर परंपरा बदलत गेली आहे. देशात आज गोवर्धन पूजा करण्यात येत आहे. प्रत्येकजण, राज्यात वेगवेगळ्या प्रकारे ही पूजा करत असते.

छत्तीसगढचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्या हातावर गोवर्धन पूजा केल्यावर चाबकाचे फटके मारण्यात आले. मुख्यमंत्री बघेल म्हणाले की, गोवर्धन पूजा ही लोकांच्या उत्सवाची परंपरा आहे. आपल्या पूर्वजांनी अशा अनेक छोट्या छोट्या परंपरा निर्माण केल्या आहेत. या परंपरांच्या माध्यमातून आपल्या आयुष्यात आनंद राहतो. तसेच आपल्या मातीच्या अस्मितेचं संवर्धन आणि रक्षा करणं हे आपल कर्तव्य आहे. छत्तीसगढमध्ये अनेक चांगल्या परंपरा आहे. हळू-हळू सर्व परंपरांचा लोकांना विसर पडेल असे वाटत होते. आमच्या सरकारमध्ये ग्रामीण भागातील परंपरांना विशेष स्थान देण्यात येईल कारण याच परंपरांमुळे आपले अस्तित्व असल्याचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी म्हटलं आहे.

- Advertisement -

मुख्यमंत्री बघेल यांनी ग्रामस्थांशी संवाद साधताना सांगितले की, दरवर्षी चाबकाचा प्रहार करण्याचा मान हा भरोसा ठाकुर यांचा होता. परंतु आता त्यांचे सुपुत्र बीरेंद्र ठाकुर ही परंपरा जपत आहेत. गोवर्धन पूजा ही गोवंशाच्या समृद्धीची पूजा आहे. त्यामुळे गोवंश जितके समृद्ध असतील तेवढाच आपला विकास होईल. यामुळेच ग्रामीण भागात गोवर्धन पूजा लोकप्रिय आहे असे मुख्यमंत्री बघेल यांनी सांगितले.

- Advertisement -

हेही वाचा : Pm Modi in Kedarnath : केदारनाथ पुनर्विकासात कच्छच्या भूकंपाचा अनुभव कामी आला- पंतप्रधान

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -