घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रसंजय राऊत नाशकात येण्यापूर्वीच ठाकरे गटाची दुसरी फळी शिंदे गटात दाखल

संजय राऊत नाशकात येण्यापूर्वीच ठाकरे गटाची दुसरी फळी शिंदे गटात दाखल

Subscribe

नाशिक : नाशिक जिल्हा आणि शहर शिवसेनेचा बालेकिल्ला मानला गेला आहे. राज्यात शिवसेनेत अभूतपूर्व फुट पडल्यावरही नाशकातील शिवसैनिकांनी संयमाची भूमिका घेतल्याचे दिसून आले होते. मात्र, आता शिवसैनिकांचा संयम ढळत चालल्याचे दिसून येत आहे. संजय राऊत शुक्रवारी सायंकाळी (दी.६) दोन दिवासीय नाशिक दौर्‍यावर येत आहेत. परंतु, त्यांच्या नाशकात दाखल होण्याच्या पूर्वीच पक्षाला पुन्हा एक मोठे खिंडार पडले आहे. पक्षातील दुसर्‍या फळीतील ५०हून अधिक कट्टर शिवसैनिक असलेले आणि कोणत्याही आंदोलनात तत्परतेने सामिल होणारे, तळागाळात पक्ष पोहचवणारेच शिवसैनिक शिंदे गटात दाखल झाले आहेत. या आधी नगरसेवक आणि आता ग्राऊंड वरच्या पदाधिकार्‍यांनी शिंदे गटात प्रवेश केल्याने हा ठाकरे गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे. संघटनात्मक पातळीवर ठाकरे गटाची मोठी पिछेहाट होण्याची शक्यता आहे.

हे झाले शिंदे गटात दाखल

योगेश बेलदार, अनिल साळुंखे, बापू लहुजी ताकटे, शिवा ताकाटे, अमोल सूर्यवंशी, योगेश चव्हाणके, प्रमोद लासुरे, रुपेश पालकर, संदेश लवटे, नाना काळे, उमेश चव्हाण, प्रमोद जाधव, संदीप डहाके, विनोद मुंगसे, शैलेश कारले, प्रसाद तांबट, प्रशांत आव्हाड, महेश जोशी, राहुल देशमुख, प्रशांत गाडगे, प्रशांत निकम, स्वप्नील गायकवाड, अजय निकम, राजेश गीते, महेश लोखंडे, अमित कटक, प्रमोद कालेकर, योगेश धामणकर, गोकुळ मते, विलास खैरनार, बाळू बोबरे, दर्शन काळे, राकेश मोरे, मोहित वराडे, अमित गांगुर्डे, समीर कांबळे, गणेश परदेशी, राहुल रंधरे, अमोल बराटे, अनिल निर्भवणे, प्रशांत निचळ, तकदीर कडवे, विशाल आहेर, आनंद भटकळ, उमेश गोणार, धीरज कडाळे, अमेय जाधव, गणपत मेनू, लक्ष्मण पाटील, मनोज उदावंत, अनिल नागरे, संदीप कदम, रवींद्र पेहरकर, पंकज भालेराव, अनिल शिंदे, संजय गवळी, योगेश सावकार, अभिजीत तागड इत्यादी पदाधिकारी त्याचसोबत शिवसैनिकांनी शिंदे गटात प्रवेश केला आहेत.

- Advertisement -
सत्ताकाळात काम झाली नसल्याची सल

शिंदे गटात सामिल झालेल्या या पदाधिकार्‍यामध्ये राज्यात सत्तांतर आणि पक्षात फुट पडल्यानंतर किंवा नाशिक मधील पदाधिकारी, नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केल्याने ही भावना उत्पन्न झालेली नाही. खरतर राज्यात उद्धव ठाकरे यांच्या रूपाने पक्षाचा प्रमुखच मुख्यमंत्री पदावर असूनही अनेक वर्ष पक्षासाठी निस्वार्थपणे झोकून देऊन काम करणार्‍या शिवसैनिकांकडे सत्ताकाळातही दुर्लक्षच केले गेले. त्याउलट बाहेरून पक्षात आलेल्यांना रेड कारपेट आथरले जात होते. तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत उमेदवारी वेळीही आयात उमेदवारांना त्यांच्या हक्काच्या जागी उमेदवारी देण्याचा घाट घातला जात होता. अश्या अनेक कारणांमुळे खदखद याधीच असल्याची भावना शिवसैनिकानी व्यक्त केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -