घरताज्या घडामोडीBJP Protest: दहशतवाद्यांना पाठीशी घालणाऱ्यांनी सत्तेत राहू नये - सुधीर मुनगंटीवार

BJP Protest: दहशतवाद्यांना पाठीशी घालणाऱ्यांनी सत्तेत राहू नये – सुधीर मुनगंटीवार

Subscribe

राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्याविरोधात आझाद मैदानावर भाजपकडून मोर्चा काढण्यात आला आहे. यावेळी भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी नवाब मलिकांसाह राज्य सरकारवर ताशेरे ओढले आहेत. दरम्यान, दहशतवाद्यांना पाठिशी घालणाऱ्यांनी सत्तेत राहू नये, असं सुधीर मुनगंटीवार म्हणाले.

या सरकराने राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना आसरा दिला. मलिकांच्या मागे शक्ती उभी केली. अंडरवर्ल्ड डॉन दाऊदशी संबंधित कनेक्शन असणाऱ्या सरकारला या महाराष्ट्रातून मुक्त केलं पाहीजे. मद्य विकणाऱ्या महाविकास आघाडी सरकारला नेस्तनाबूत करून या महाराष्ट्राच्या जनतेला शेतकरी, शेतमजूर वंचिताला आझाद करण्याचा आम्ही संकल्प घेऊन आलो आहे. हे युद्ध धर्म आणि अधर्माच्या बाजूने आहे. एकीकडे धर्माच्या बाजूने लढणारे सैनिक आहेत. तर दुसरीकडे मलिकांना वाचवणाऱ्या अधर्माची बाजू घेणारे बेईमान लोकं एकत्र आले आहेत, असं सुधीर मुनगंटीवार म्हणाले.

- Advertisement -

सत्तेच्या हव्यासापोटी पीयो व्हाईन आणि रहो फाईनचा नारा देणारे हे नादान लोक एकीकडे आहेत. आतंकवाद्याची जमीन घेणाऱ्या नवाब मलिकांना खुर्चीच्या प्रेमापोटी हे खुर्ची सम्राट वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. दहशतवाद्यासारख्या घटनेत ज्यांचा प्रत्यक्ष सहभाग आहे. त्यांना पैसे पुरवण्याचं काम आणि जमीन खरेदी करण्याचं काम ज्या लोकांनी केलं. अशा लोकांना सरकारमध्ये राहण्याचा अधिकार नाहीये, असं मुनगंटीवार म्हणाले.

आम्हाला खुर्चीची चिंता नाहीये. आम्हाला चिंता आहे ती फक्त या राज्यामध्ये आतंकवादाला पोषण देण्याचं काम करतात, त्यांच्या विरूद्धच्या लढाईचं आहे. ज्या देशाचा देशभक्त आतंकवादाची घटना पुढे ढकलतो. त्या देशाची सुरक्षा आणि लोकशाही कधीही सुरक्षित राहू शकत नाही.

- Advertisement -

१९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटाच्या घटनेत दुसऱ्या महायुद्धात जेवढा आरडीएक्स वापरण्यात आला होता. तेवढाच आरडीएक्स मुंबईच्या घटनेत वापरण्यात आला होता. तेव्हाच्या मुख्यमंत्र्यांविरोधात आम्ही एकत्र आलो आहोत. त्या घटनेत २५७ निरापराध लोकांचा मृत्यू झाला. तेव्हा त्याची चिंता तेव्हाच्या मुख्यमंत्र्यांना नव्हती. बारा मार्च हा घटनेचा योगायोग होता. कारण घटना बारा मार्चची, तेव्हाच्या मुख्यमंत्र्यांचा जन्मदिवस सुद्धा १२ मार्च, आमदार विधानपरिषदेचे बारा करा यासाठी आग्रह आणि महाराष्ट्राचे १२ वाजले तरी मुख्यमंत्री म्हणाले होते की, या घटना १२ नाही तर १३ ठिकाणी घडल्या. दरम्यान, या दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या नेत्यांच्या तावडीतून महाराष्ट्राच्या साडेबारा कोटी जनतेला आझाद करण्याचा संकल्प हेच या मोर्चाचं उद्दिष्ट असल्याचं सुधीर मुनगंटीवार म्हणाले.


हेही वाचा : Maharashtra Budget Session 2022 : आधी वादग्रस्त विधान, मग पडळकरांची दिलगिरी


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -