घरताज्या घडामोडीपरमबीर सिंग यांची SC मध्ये धाव, अनिल देशमुखांची पारदर्शक चौकशीची मागणी

परमबीर सिंग यांची SC मध्ये धाव, अनिल देशमुखांची पारदर्शक चौकशीची मागणी

Subscribe

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या पत्रामुळे राज्यातील राजकारणात नाहीतर देशातील राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. या पत्राद्वारे सिंग यांनी अनिल देशमुखांवर पैसे वसुली करण्याचा आरोप केला आहे. याचसंदर्भात आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन देशमुख यांची पाठराखण केली. देशमुखांवर केलेल्या आरोपात काही तथ्य नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर आता पत्रातील आरोपीची सखोल चौकशी होण्यासाठी परमबीर सिंग यांनी थेट सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लिहिलेल्या पत्रातील आरोपाची चौकशी व्हावी, या मागणीसाठी मुंबईच माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. पत्रात केलेल्या आरोपांची चौकशी निष्पक्षपणे व्हावी, अशी मागणी सिंग यांनी केली आहे. अनिल देशमुख यांच्याविरोधात कोणतेही आयपीएस अधिकारी बोलतात किंवा त्यांच्याविरोधातील पुरावे सरकारला देतात, तर त्यांची उचलबांगडी केली जाते, अशी माहिती याचिकेत सिंग यांनी नमुद केली आहे.

- Advertisement -

याचिकेत नेमके काय?

फेब्रुवारी २०२१ रोजी अनिल देशमुख यांच्या निवासस्थानी सचिन वाझे आणि संजय पाटील यांच्यासोबत बैठक घेतली होती. ही बैठक या दोघांच्या वरिष्ठांना डावलून पार पडली होती. या बैठकीमध्ये देशमुखांनी महिन्याला १०० कोटी रुपये गोळा करण्याचे टार्गेट दिले होते. याआधी ऑगस्ट २०२० रोजी रश्मी शुक्ला यांनी पोलीस महासंचालकांना, पोस्टिंग किंवा बदलीमध्ये अनिल देशमुखांकडून भ्रष्टाचार होत असल्याचे सांगितले होते. पण त्यावेळेस अनिल देशमुखांवर कोणतीही कारवाई न होता रश्मी शुक्लांनाच सुनावण्यात आले होते.


हेही वाचा – शरद पवारांनी न्यायाधीश होऊ नये – सुधीर मुनगंटीवार

- Advertisement -

 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -