घरमहाराष्ट्रसंशयित बोटीत सापडलेल्या स्फोटक वस्तू एटीएसकडून जप्त, फॉरेन्सिक लॅबचं पथकही घटनास्थळी दाखल

संशयित बोटीत सापडलेल्या स्फोटक वस्तू एटीएसकडून जप्त, फॉरेन्सिक लॅबचं पथकही घटनास्थळी दाखल

Subscribe

रायगडच्या श्रीवर्धन तालुक्यातील हरीहरेश्वर समुद्र किनारी एक बोट सापडल्याची प्राथमिक माहिती गुरुवारी दुपारच्या सुमारास मिळाली. हरिहरेश्वर येथील बोटीत दोन तीन एके-47 आढळल्या. त्याशिवाय 225 राउंड्स गोळ्या आढळल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. या बोटीत सापडलेले हे साहित्य आता एटीएसने जप्त केली आहेत. तसंच, फॉरेन्सिक लॅबचं पथकही घटनास्थळी दाखल झालं आहे. दरम्यान, हरिहरेश्वर किनाऱ्यावर सापडलेल्या संशयास्पद बोटीमुळे रायगड, मुंबई, मालवणच्या समूद्र किनाळऱ्यावर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

हेही वाचा – श्रीवर्धनमध्ये एके-47 सह आढळलेली संशयित बोट ऑस्ट्रेलियन महिलेची; विधानसभेत फडणवीसांची माहिती

- Advertisement -

कालपासून सगळीकडे कृष्णाष्टमी आणि दहीकालाचा जल्लोष सुरू आहे. संपूर्ण महाराष्ट्रात उत्साहाचे वातावरण असतानाच काल रायगड येथील हरिहरेश्वर येथे एक संशयास्पद बोट आढळून आली. या बोटीमध्ये एके ४७ रायफल्स आणि जिवंत काडतुसं सापडल्याने एकच खळबळ माजली होती. ही घटना समोर येताच तत्काळ सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आणि तपास सुरू करण्यात आला. ही बोट ऑस्ट्रेलियातील असल्याची माहिती तपासातून समोर आलं आहे.

“आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, या बोटीचे नाव लेडी हार्न असे आहे. तसेच, ही बोट ऑस्ट्रेलियामधील आहे. ऑस्ट्रेलियाच्या हाना लॉंडर्न्स गन यांच्या मालकीची आहे. या ऑस्ट्रेलियन महिलेचे पती जेम्स हार्बट या बोटीचे कॅप्टन आहेत. ही बोट मस्कतहून युरोपच्या दिशेने जात होती. २६ जून २०२२ रोजी या बोटीचे इंजिन खराब झाल्याने खलाश्यांनी मदतीसाठी संपर्क साधला. त्यानंतर एक वाजताच्या सुमारास एका कोरीयन युद्ध नौकेने खलाश्यांची सुटका केली. त्यांनतर त्यांना ओमानला सुपूर्द केले”, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी विधानसभेत दिली.

- Advertisement -

हेही वाचा – श्रीवर्धनमध्ये आढळलेल्या बोटीच्या घटनेने मुंबईत नाकाबंदी; महाराष्ट्रात हायअलर्ट

“समुद्र खवळलेला असल्याने या बोटीचे टोव्हींग करता आले नाही. तसचे, समुद्राच्या लाटांमुळे ही बोट हरिहरेश्वरच्या समुद्र किनाऱ्याला लागल्याची माहिती भारतीय कोस्ट गार्डने दिली. या घटनेची माहिती मिळताच दहशतवादी पथक आणि स्थानिक पोलीस या बोटीची अधिक तपासणी करत आहेत. तसेच, येत्या काळात उत्सव असल्याने या पार्श्वभूमीवर सर्व पोलिसांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे”, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -