Tuesday, May 11, 2021
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र परमबीर सिंगांविरोधात एट्रोसिटीची तक्रार; भ्रष्टाचार प्रकरणी गुन्हा दाखल, उपायुक्त पराग मणेरे यांचंही...

परमबीर सिंगांविरोधात एट्रोसिटीची तक्रार; भ्रष्टाचार प्रकरणी गुन्हा दाखल, उपायुक्त पराग मणेरे यांचंही नाव

Related Story

- Advertisement -

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप करणारे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग आता अडचणीत आले आहेत. अनिल देशमुखांवर आरोप करणाऱ्या परमबीर सिंग यांच्यावर पोलीस दलातील अधिकाऱ्यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. कनिष्ठ अधिकाऱ्यांना त्रास देणे, धमक्या देणे या अंतर्गत तसंच एट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अकोला येथे कार्यरत असलेले पोलीस अधिकारी भीमराव घाडगे यांनी केलेल्या परमबीर सिंह यांच्यावरील भष्टाचाराच्या आरोपांवरुन अकोल्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे परमबीर सिंह यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. एकूण ३३ अधिकाऱ्यांविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

गावदेवी पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक अनुप डांगे यांच्यानंतर अकोला येथे कार्यरत असलेले पोलीस अधिकारी भीमराव घाडगे यांनी परमबीर सिंह यांच्यावर भष्टाचाराचा आरोप करून मुख्यमंत्री यांच्यासह पोलीस महासंचालक यांच्याकडे तक्रार अर्ज दाखल केला होता. या अर्जात त्यांनी परमबीर सिंह यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. अखेर अकोला येथे परमबीर सिंग यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. अकोल्यातल्या कोतवाली पोलीस ठाण्यात परमबीर सिंग, डीसीपी पराग मणेरे आणि आणखी काही अधिकाऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परमबीर यांच्या सह ३३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांच्यावर एट्रोसिटी कायदा (जातीवाचक) भ्रष्ट्राचार आदी कलम लावण्यात आले आहेत. दरम्यान, अकोल्यातून गुन्हा दाखल करून तपासासाठी ठाण्यात वर्ग करण्यात आल्याची माहिती पोलीस अधिक्षकांनी दिली.

पोलीस निरीक्षक भीमराव घाडगे यांनी परमबीर यांच्यावर हजारो कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप केलाय. शिवाय काही अधिकारी त्यांना मदत करत होते असही पत्रात म्हटलं होतं. ठाण्याचे आयुक्त असताना परमबीर यांनी हजारो कोटींचा भ्रष्टाचार केला, असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. पोलीस अधिकारी भीमराव घाडगे यांनी परमबीर सिंह यांच्यावरच नाहीतर त्यांच्या कुटुंबावरही अत्यंत गंभीर आरोप लावले आहेत. परमबीर सिंह यांची पत्नी इंडिया बुल्स कार्यालयात काम करतात. जिथे हजारो कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे. त्याचसोबत परमबीर सिंह यांचा मुलगा रोहन याचा सिंगापूरमध्ये मोठा व्यवसाय असल्याची माहितीही या पत्रातून देण्यात आली आहे. परमबीर सिंह यांनी भ्रष्टाचारातून कमावलेले पैसे मुलाच्या सिंगापूरमधील व्यवसायात गुंतवले असल्याचाही आरोप त्यांनी केला आहे.

- Advertisement -

 

- Advertisement -