गांजाप्रकरणी अ‍ॅमेझॉन संचालकाविरुद्ध गुन्हा

मध्य प्रदेश पोलिसांनी २० किलो गांजासह घेतले होते ताब्यात

amazon india launched christmas storefront available in many products including smartphones

नवी दिल्ली – ऑनलाइन माध्यमातून गांजा पुरवल्याबद्दल अ‍ॅमेझॉनच्या काही स्थानिक पदाधिकार्‍यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मध्य प्रदेशातल्या पोलिसांनी १४ नोव्हेंबर रोजी दोघांना २० किलो गांजासह ताब्यात घेतले होते. त्यावेळी त्यांच्या लक्षात आले की हे लोक अ‍ॅमेझॉन वेबसाईटचा वापर गांजा खरेदी आणि पुरवठा करण्यासाठी करत होते. आपल्या निवेदनात मध्य प्रदेश पोलिसांनी म्हटले आहे की, अ‍ॅमेझॉन इंडियाच्या काही कार्यकारी संचालकांवर एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी याप्रकरणाची चौकशी कंपनीकडे केली असता त्यांनी सादर केलेली कागदपत्रं आणि दिलेली उत्तरं यात तफावत आढळून आल्याने पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.