Tuesday, June 6, 2023
27 C
Mumbai
घर ठाणे ठाण्यात शीळफाट्यावर १३ गोडाऊन जळून खाक; सहा तासांनी आगीवर नियंत्रण

ठाण्यात शीळफाट्यावर १३ गोडाऊन जळून खाक; सहा तासांनी आगीवर नियंत्रण

Subscribe

ठाणे: मुंब्रा – पनवेल रोडवरील शीळफाटा या ठिकाणी असलेल्या महाराष्ट्र कंपाउंडमधील तब्बल १३ गोडाऊनला आग लागल्याची घटना सोमवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास घडली. अंदाजे सहा तासांच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले. सुदैवाने या घटनेत कोणालाही दुखापत झाली नसली तरी गोडाऊन जळून खाक झाले आहेत. हे गोडाऊनमध्ये रबर व चप्पल मटेरियल,प्लास्टिक बॉटल,पुठ्ठा,चिंधी आदी जुने साहित्याचे होते. त्यामुळे आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी उशीर होत होता. या आगीचे कारण अद्यापही समोर आले नाही, अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली.

आग लागल्याची माहिती मिळताच घटनास्थळी सहाय्यक आयुक्त (दिवा प्रभाग समिती), आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, मुख्य अग्निशमन अधिकारी व कार्यालयीन अधिक्षक तसेच टोरंट पॉवर कंपनीचे कर्मचारी, डायघर पोलीस स्थानकाचे अधिकारी व कर्मचारी, आपत्ती व्यवस्थापन विभागाचे कर्मचारी, आपत्ती प्रतिसाद दलाचे जवान व अग्निशमन दलाचे अधिकारी व जवान यांनी धाव घेतली.  आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान व आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी शर्तीचे प्रयत्न सुरू केले. मात्र जुने साहित्य जमा करून ठेवल्याने आगीवर नियंत्रण मिळविणे कठीण होत होते.

- Advertisement -

त्यातच रबर, प्लास्टिक असल्याने ती आग नियंत्रणात येण्यासाठी उशीर झाला. संध्याकाळी ८ वाजण्याच्या सुमारास आगीवर नियंत्रणात मिळाले. पण त्या ठिकाणी कुलिंगचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. यावेळी त्या परिसरात मोठया प्रमाणात धूर पसरला होता. तसेच त्या गोडावून मालकांची ओळख पुढे आली आहे. आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी ५ फायर वाहन व ५ वॉटर टँकर, ३ खाजगी वॉटर टँकर, १ रेसक्यू वाहन बोलविण्यात आले होते.रबर व चप्पल मटेरियल, रबर शिट, प्लास्टिक बॉटल, लाकडे, कागद, डेकोरेशन मटेरियल, पुठ्ठा, मेडिसिन बॉटल, चिंधी, नमकिन आदी साहित्य असलेली ही गोडाऊन होती. आग लागल्यानंतर तेथील परिसरात एकच खळबळ उडाली. कोणतीही जिवीत हानी न झाल्याने सर्वांचाच जीव भांड्यात पडला.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -