Eco friendly bappa Competition
घर महाराष्ट्र मानखुर्दमध्ये अग्नितांडव: भंगाराच्या दुकानाला भीषण आग;अग्निशमन दलाच्या 12 गाड्या घटनास्थळी दाखल

मानखुर्दमध्ये अग्नितांडव: भंगाराच्या दुकानाला भीषण आग;अग्निशमन दलाच्या 12 गाड्या घटनास्थळी दाखल

Subscribe

मुंबईतील मानखुर्द परिसरातील मंडला येथे मंगळवारी मध्यरात्री एका भंगाराच्या दुकानाला भीषण आग लागली. आगीने मोठे उग्र रुप धारण केले आहे

मुंबईतील मानखुर्द परिसरात मध्यरात्री एका भंगाराच्या दुकानाला भीषण आग लागली. मुंबईतील मानखुर्द परिसरातील मंडला येथे मंगळवारी मध्यरात्री एका भंगाराच्या दुकानाला भीषण आग लागली. आगीने मोठे उग्र रुप धारण केले आहे. या आगीमुळे परिसरात धुराचे साम्राज्य पसरले आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे 12 बंब घटनास्थळी दाखल झाले असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरु आहे. आग रद्दी आणि रिकाम्या तेलाच्या ड्रममध्ये लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. ( Fire in Mankhurd Massive fire at scrap shop 12 fire engines reached the spot )

अग्निशमन दलाच्या 12 गाड्या घटनास्थळी दाखल

आगीची माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि अग्निशमन दलाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले. अग्निशमन दलाचे अधिकारी आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न करत आहेत. अग्निशमन दलाच्या सुमारे 12 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरु आहे. आगीच्या ज्वाळा आणि धुराचे लोट दूरवर दिसत आहेत. या आगीच्या घटनेचा पोलीस तपास करत आहेत.

- Advertisement -

( हेही वाचा: राष्ट्रवादीतील संभाव्य फुटीने भाजपा-शिंदे गटात अस्वस्थता, सत्तासमीकरण बदलणार! )

कोणतीही जीवितहानी नाही

मानखुर्द मध्य़े लागलेल्या या आगीने एकच खळबळ उडाली आहे. सोमवारी मध्यरात्री दोन ते अडीच वाजेच्या सुमारास मुंबईतील मानखुर्दच्या मांडला भंगार कंपाऊंडमध्य़े भीषण आग लागल्याची घटना घ़डली. मध्यरात्री ही आग लागल्याने आगीची बातमी समजण्यास उशिर झाला आणि आगीने भीषण रुप धारण केले. आग लागल्याचे समजताच अग्निशमन दलाला पाचाराण करण्यात आले. त्यानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले त्यामुळे मोठी हानी टळली. तसेच, या आगीत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -