घरताज्या घडामोडीधक्कादायक, पुण्यातील शाळेत दहशतवाद्यांचं ट्रेनिंग सेंटर, NIAकडून मोठी कारवाई

धक्कादायक, पुण्यातील शाळेत दहशतवाद्यांचं ट्रेनिंग सेंटर, NIAकडून मोठी कारवाई

Subscribe

पुण्यातील एका शाळेत दहशतवादीचं प्रशिक्षण सुरू असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पुण्यातील पीएफआयकडून ब्लू बेल नावाच्या शाळेत दोन मजल्यावर दहशतवादी प्रशिक्षण सुरू करण्यात आलं होतं. तसेच या शाळेत शस्त्रप्रशिक्षण आणि हल्ला करण्याचं ट्रेनिंग पीएफआयकडून दिलं जात होतं अशी माहिती समोर येतेय. परंतु या शाळेवर NIAकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे.

- Advertisement -

या शाळेच्या चौथ्या आणि पाचव्या मजल्याचा वापर हा देशविरोधी कृत्यांसाठी केल्याचा ठपका NIAने ठेवला आहे. NIAने या शाळेचे दोन मजले सील केले होते. मुस्लीम तरुणांना गळाला लावून त्यांना दहशतवादी प्रशिक्षण देण्यासाठी या शाळेचा वापर केला जात होता. त्यानंतर तातडीने कारवाई करत यूएपीए कायद्यांतर्गत NIAने या शाळेचा चौथा आणि पाचवा मजला सील केला.

- Advertisement -

दरम्यान, २२ सप्टेंबर २०२२ रोजी याच शाळेवर छापे टाकण्यात आले होते. २०४७ पर्यंत भारताला इस्लामिक देश बनवण्याचं पीएफआयचं लक्ष्य आहे. NIA ने गेल्यावर्षी देशभर पीएफआयच्या तळांवर छापे मारले होते. मोठ्या प्रमाणात देशभर अटकसत्र झालं होतं.


हेही वाचा : लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी आम्ही एकत्र – उद्धव ठाकरे


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -