घरमहाराष्ट्रधक्कादायक : यामुळे कोकण किनारपट्टीवरुन मासे झाले गायब

धक्कादायक : यामुळे कोकण किनारपट्टीवरुन मासे झाले गायब

Subscribe

बंगालच्या उपसागरावरुन येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यांचा मच्छीमारीला फटका बसला आहे. तब्बल १ कोटींचे नुकसान झाले असून मच्छीमार चिंतेत आहेत.

कोकणचा समुद्रकिनारा म्हणजे त्या किनाऱ्याच्या बाजूला असलेली नारळाची आणि सुपारीची झाड. तर दुसऱ्या बाजूला बांधून ठेवण्यात आलेल्या मच्छीमाऱ्यांच्या बोटी. मात्र काही दिवसांपासून या बोटी किनाऱ्यावरचं बांधून ठेवण्यात आल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून समुद्रावरील वाऱ्याचा वेग अधिक होता त्यामुळे मासे मिळत नव्हते. मात्र आता समुद्रावरील वाऱ्याचा वेग कमी झाल्यानंतरही मासे मिळत नसल्याने येथील मच्छीमार धास्तावले आहेत. मात्र ते मासे नैसर्गिक कारणांबरोबरच मानवनिर्मित कारणेही या परिस्थितीमागे असल्याचे चित्र पुढे आले आहे.

एक कोटींचे नुकसान

बंगालच्या उपसागरावरुन येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यांचा गेल्या आठवड्यात कोकण किनारपट्टीला फटका बसला आहे. ताशी ४० ते ५० किलोमीटरने वाहणाऱ्या वेगवान वाऱ्यामुळे सलग चार दिवस मासेमारी बंद ठेवावी लागली होती. त्यामुळे सुमारे १ कोटीचे नुकसान सहन करावे लागले. या आठवड्याच्या सुरुवातीपासून वाऱ्याचा वेग मंदावल्याने मासेमारीला पुन्हा सुरुवात झाली, पण समुद्रात फारसे मासेच मिळत नसल्याने मच्छीमार चिंतेत आले आहेत.

- Advertisement -

यामुळे जाणवतो मच्छीचा तुटवडा

जाणकारांच्या मते, एलईडी दिव्यांच्या तीव्र प्रकाशझोतात अनिर्बंध मासेमारी आणि इतर माशांना पळवून लावणाऱ्या ट्रीगर फिशमुळे मच्छीचा तुटवडा जाणवत आहे. समुद्रातील बदललेल्या प्रवाहामुळे खोल समुद्रातील या माशांनी राज्याच्या सागरी परिक्षेत्रात येऊन धुमाकूळ घातला आहे. त्यांची चाहूल लागताच अन्य मासे गायब होतात. त्यामुळे मत्स्योत्पादन घटल्याची माहिती सहाय्यक मत्स आयुक्तकार्यालयाने दिली आहे.

ही आहेत कारण

पर्ससिन, मिनी पर्ससिन बोटींची बेकायदा मासेमारी आणि प्रखर झोत असलेल्या एलईडी दिव्यांच्या वापरामुळे ही परिस्थिती उद्भवल्याचा आरोप अखिल महाराष्ट्र मच्छीमारी समितीचे अध्यक्ष खलील वस्ता यांनी केला आहे. रात्रीच्यावेळी एलईडी दिव्यांचा वापर करुन मासेमारीला बंदी आहे. मात्र, वेगवेगळ्या युक्त्या वापरुन तशी मासेमारी छुप्या पद्धतीने चालूच आहे. परवानाधारक मिनी पर्ससिन बोटींच्या दुप्पट बेकायदा बोटींची संख्या आहे. केरळ – कर्नाटकापासून परराज्यातील बोटींचा धुमाकूळ चालूच असल्याचा आरोप स्थानिक लोकप्रतिनिधींनी केला आहे.

- Advertisement -

वाचा – कोकणातील शेतकर्‍यांबाबत मला अभिमान -सुमित्रा महाजन

वाचा – कोकण मंडळ सदनिकांसाठी विशेष मोहीम


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -