घरताज्या घडामोडीवर्षा उसगावकरांनी माफी मागावी अन्यथा सडके मासे खाऊ घालू; संतापलेल्या कोळी महिलांचा...

वर्षा उसगावकरांनी माफी मागावी अन्यथा सडके मासे खाऊ घालू; संतापलेल्या कोळी महिलांचा इशारा

Subscribe

मराठीतील नामवंत अभिनेत्री वर्षा उसगावकर यांना सध्या कोळी बांधवांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. याच कारण म्हणजे वर्षा उसगावकर यांनी एका जाहिरातीत काम केले असून, यामध्ये "बाजारात बऱ्याच वेळा कोळणींकडून माझी फसवणूक झाली आहे.

मराठीतील नामवंत अभिनेत्री वर्षा उसगावकर यांना सध्या कोळी बांधवांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. याच कारण म्हणजे वर्षा उसगावकर यांनी एका जाहिरातीत काम केले असून, यामध्ये “बाजारात बऱ्याच वेळा कोळणींकडून माझी फसवणूक झाली आहे. बाजारातल्या पापलेटला इतका घाणेरडा वास येतो की, त्यावेळी मी हे पापलेट का घेतले, असे वाटून निराश झाले”, असे वादग्रस्त विधान वर्षा उसगावकर यांनी केले आहे. त्यांच्या या वक्तव्यावर मच्छिमारांनी संताप व्यक्त केला असून, ज्या ऑनलाइन अॅपने ही जाहिरात प्रदर्शित केली आहे त्यांनी कोळी महिलांची माफी मागावी अन्यथा त्यांना कायदेशीर नोटीस बजावली जाईल, अशी भुमिका मच्छिमारांनी घेतली आहे. (fisherman committee gets angry on marathi actress varsha usgaonkar)

काही दिवसांपूर्वी कोळी बांधवांचा अपमान करणारी जाहिरात प्रसिद्ध झाली होती. त्यात म्हटले होते ‘बाजार की मच्छी के साथ बदबू फ्री’. आता या जाहिरातीपाठोपाठ आणखी एक जाहिरात एका अॅपवर प्रसिद्ध झाली आहे. या जाहिरातीत वर्षा उसगांवकर आहेत.

- Advertisement -

‘मासे खायला मला आवडतात. ते ताजे आहेत की नाही याची चव मला लगेच समजते पण बाजारात मासे घ्यायला जाते तेव्हा ते मासे ताजे आहेत की नाही हे त्यावेळी कळत नसल्याने माशांची निवड करता येत नाही. त्यामुळे बाजारात जाते तेव्हा बऱ्याच वेळा माझी कोळणींकडून फसवणूक झालेली आहे. विशेषतः पापलेटच्या बाबतीत, बाजारात ते पापलेट खूप ताजे आहेत, असे वाटतात. घरी आल्यानंतर त्या पापलेटला इतका घाणेरडा वास येतो की त्यावेळी मी हे पापलेट का घेतले असे वाटून निराश झाले. त्यावेळी हे खासगी अॅप माझ्या आयुष्यात वरदान स्वरूपात आले’ असे उसगावकर यांनी या जाहिरातीत म्हटले आहे.

वर्षा उसगांवकर यांच्या या जाहिरातीवर मच्छिमारांनी संताप व्यक्त केला आहे. तसेच, वर्षा उसगावकार यांनी याबाबत मासे विक्रेत्या कोळी महिलांची जाहीर माफी न मागितल्यास त्यांच्या शूटिंगच्या सेटवर जाऊन त्यांना सडलेले मासे खाऊ घालण्यात येतील, असा इशारा मच्छिमारांकडून देण्यात आला आहे.

- Advertisement -

दरम्यान, ज्या ऑनलाइन अॅपने ही जाहिरात प्रदर्शित केली आहे त्यांनी कोळी महिलांची माफी मागावी अन्यथा त्यांना कायदेशीर नोटीस बजावली जाईल. तसेच ही जाहिरात सर्व माध्यमातून काढण्यात यावी, तसे न केल्यास संबंधित कंपनीच्या विरोधात न्यायालयात दावा दाखल करण्यात येणार असल्याचे माहिती समितीचे उपाध्यक्ष अॅड. कमलाकर कांदेकर यांनी दिली. याबाबत विचारणा करण्यासाठी उसगावकर यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

काही महिन्यांपूर्वी एका ऑनलाइन मासे विक्रेत्या कंपनीने बाजारातील मासळीला असह्य दुर्गंधी येते, माशांसोबत दुर्गंधी मोफत, अशा जाहिरातीचा व्हिडिओ सोशल मीडियात प्रसिद्ध केला होता. त्याचे कोळी समाजात तीव्र पडसाद उमटले. समाजाने कंपनीला कायदेशीर नोटीस पाठवल्यानंतर कंपनीने ती जाहिरात मागे घेतली होती. त्याच प्रकारची एक जाहिरात एका खासगी मासे विक्रेत्या अॅपने बनवली असून ती फेसबुकवर प्रसिद्ध करण्यात आली. दरम्यान, सोमवारी दुपारनंतर ही जाहिरात फेसबुकवरून काढून टाकण्यात आली. विशेष म्हणजे वर्षा उसगावकर यांनी या अॅपचे प्रमोशन केले आहे.


हेही वाचा – Coronavirus : देशातील पहिल्या नेजल लसीला DCGI ची मान्यता; आरोग्यमंत्र्यांची माहिती

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -