घरमहाराष्ट्रभातसा धरणाचे पाच दरवाजे उघडले

भातसा धरणाचे पाच दरवाजे उघडले

Subscribe

मुंबईला पाणी पुरवठा करणारे शहापूर तालुक्यातील महत्वाचे भातसा धरण सोमवारी ८० टक्के भरले. त्यामुळे धरणाचे पाच दरवाजे 0.50 अर्धा मीटरने उचलले असून पाच दरवाज्यातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे मुंबईकरांना पाणीपुरवठ्याबाबत दिलासा मिळाला आहे.

ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील तानसा, मोडकसागर, पाठोपाठ भातसा धरणही भरत आले आहे. सोमवारी सायंकाळी ठीक 5.00 वाजता धरणाचे पाच दरवाजे उघडले असून भातसा नदी किनार्‍या लगतच्या साजीवली, सावरशेत, सापगाव, खुटघर अशा अन्य गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. असे जलसंपदा विभागाच्या भातसा धरण विभागातून सांगण्यात आले.

- Advertisement -

मुंबईला पाणी पुरवठा करण्याची महत्वाची जबाबदारी भातसा धरणावर आहे. प्रतिदीन 2 हजार एमएलडी पाणी भातसा धरणातून मुंबई व ठाणे महानगराला दिले जाते. या धरणाची लांबी 959 मीटर असून तळपायापासून उंची 89 मीटर आहे. तसेच एकूण जलसंचय 976 .10 दशलक्षघनमीटर आहे. तसेच धरणाचे पाणलोट क्षेत्र 388.50 चौरस किलोमीटर आहे. भातसा धरणाला जोडलेला उजवा तीर कालवा 67 किलोमीटर आहे. तर डावा कालवा 50 किलोमीटर आहे. भातसाधरणाच्या पाण्यावरती जलविद्युत केंद्राद्वारे 15 मेगावॅट एवढी वीजनिर्मिती केली जाते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -