घरताज्या घडामोडीगडचिरोलीत पूरस्थिती; शनिवार १६ जुलैपर्यंत शाळेला सुट्टी

गडचिरोलीत पूरस्थिती; शनिवार १६ जुलैपर्यंत शाळेला सुट्टी

Subscribe

गेल्या काही दिवसांपासून राज्यात सतत होणाऱ्या मुसळधार पावसामुळे गडचिरोली जिल्ह्याला मोठा फटका बसला आहे. पावसाची संततधार कायम असल्याने गडचिरोलीत पुरस्थिती निर्माण झाली आहे. पुरस्थितीमुळे जिल्ह्यातील 10 मार्ग सध्या बंद अवस्थेत आहेत.

गेल्या काही दिवसांपासून राज्यात सतत होणाऱ्या मुसळधार पावसामुळे गडचिरोली जिल्ह्याला मोठा फटका बसला आहे. पावसाची संततधार कायम असल्याने गडचिरोलीत पुरस्थिती निर्माण झाली आहे. पुरस्थितीमुळे जिल्ह्यातील 10 मार्ग सध्या बंद अवस्थेत आहेत. त्यामुळे पूरस्थिती लक्षात घेत शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी शनिवार 16 जुलैपर्यंत शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. (flood situation in gadchiroli due to heavy rainfall )

मिळालेल्या माहितीनुसार, गडचिरोली जिल्ह्यात गेल्या 24 तासात 12 पैकी 8 तालुक्‍यांमध्ये अतिवृष्टी झाली आहे. भामरागड येथे 24 तासात 160 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. तसेच, जिल्ह्यातील 10 मार्ग सध्या बंद अवस्थेत आहेत.

- Advertisement -

धरण क्षेत्रात झालेल्या पावसामुळे धरणातून आठ हजारांहून अधिक क्युसेक जलविसर्ग होत असल्याने वैनगंगा नदीकाठच्या गावांना दिला अति सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पुढचे काही दिवस मुसळधार पावसाचे असल्याने नागरिकांनी सतर्कतेचा प्रशासनाकडून इशार देण्यात आले आहे. सिरोंचा तालुक्यातील मेडीगट्टा महा बंधाऱ्यातून 15 लाख 77 हजार क्युसेक एवढा विसर्ग सुरू आहे.

पर्लकोटा नदीच्या पाणी पातळीत प्रचंड वाढ झाली आहे. त्यामुळे भामरागड तालुका आणि तालुक्यातील अनेक गावांचा जिल्हा मुख्यालयापासून संपर्क तुटला आहे. गोसीखुर्द धरणातून 12 हजार क्यूसेक जलविसर्ग करणार असल्याची माहिती जलसंपदा विभागाने गडचिरोली जिल्हा प्रशासनाला माहिती दिली आहे.

- Advertisement -

धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सातत्याने पाऊस होत असल्याने विसर्ग वाढवणार असल्याची माहिती आहे. नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. जिल्ह्याच्या वैनगंगा नदीकाठच्या भागात पुर येण्याची शक्यता आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी गडचिरोलीत निर्माण पूरस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पाहाणी दौरा केला.


हेही वाचा – पूरपरिस्थितीत मार्गदर्शन करण्यासाठी राज्यपाल आहेत कुठे?, राऊतांचा सवाल

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -