घरमहाराष्ट्रमनसे आणि राष्ट्रवादी एकत्र येणार?

मनसे आणि राष्ट्रवादी एकत्र येणार?

Subscribe

येत्या २०१९ च्या लोकसभा आणि विदानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी हालचाली सुरु केल्या आहेत. दरम्यान, मनसे आणि राष्ट्रवादी यांच्यात युती होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे डोंबिवली दौऱ्यावर होते. डोंबिवली येथील राजगढ आणि राजाजी पथ येथे महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या शाखेचे उद्घाटन राज ठाकरे यांच्या हस्ते झाले. यावेळी राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश तपासे यांनी राज ठाकरेंची भेट घेतली. या भेटीमागे काय उद्देश होता असे तपासे यांना विचारले असता ते म्हणाले की, राज ठाकरे यांच्या भेटीमागे कोणताही उद्देश नसून, ही फक्त सदिच्छा भेट आहे. मात्र, शरद पवार यांचा काहीतरी निरोप घेऊनच तपासे आले होते आणि त्यांनी तो निरोप राज ठाकरे यांना दिला असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

हेही वाचा – शरद पवार – राज ठाकरेंच्या ‘विमान भेटी’त काय बोलणं झालं?

- Advertisement -

राज ठाकरेंनी पवारांचे कौतुक केले होते

काही दिवसांपूर्वा राज ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी एकत्र विमान प्रवास केला होता. त्याचबरोबर राज ठाकरे यांनी भर सभेत शरद पवार यांचे कौतुक केले आहे. त्यामुळे मनसे आणि राष्ट्रवादी युतीच्या मार्गावर आहेत की काय अशी चर्चा राजकीय पटलावर रंगाताना दिसत आहे. त्यातल्या त्यात आज राष्ट्रवादीचे तपासे यांनी राज ठाकरेंची भेट घेतली त्यामुळे येत्या २०१६च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या तयारीला मनसे आणि राष्ट्रवादी भाजप आणि शिवसेनाला हरवण्यासाठी युती करणार का, हा प्रश्न पडला आहे.

समविचारी पक्षांना बरोबर नेऊ – अजित पवार

शनिवारी पुण्याच्या मांजरी येथील वसंतदादा शुगर अन्स्टिट्यूटची ४२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा आणि पुरस्कार वितरण समारंभ पार पडला. या कार्यक्रमात शरद पवार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार हजर होते. यावेळी माध्यमांशी बोलताना अजित पवार म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत काँग्रेससोबत आघाडी करण्याची चर्चा असून ४८ पैकी ४० जागांवर आमचे एकमत झाले आहे. त्याचबरोबर अन्य ८ जागांवर चर्चा सुरु असल्याची माहिती अजित पवार यांनी दिला. यावेळी मनसेसोबत युती करणार का, असा प्रश्न विचारला असता समविचारी पक्षांना सोबत घेऊन पुढे जाऊ, असे सांगत अजित पवार यांनी प्रश्नाला उत्तर देणे टाळले आहे. त्यामुळे राष्ट्रवादी आणि मनसे युती करणार का, या प्रश्नाला दुजोरा मिळताना दिसत आहे.

- Advertisement -

हेही वाचा – राज ठाकरे यांच्या राजकारणाची दशा आणि दिशा !

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -