घरमहाराष्ट्र'डिप्रेशनमुक्त मुंबई'साठी नायर रुग्णालयाकडून सर्वेक्षण, वैद्यकीय तज्ज्ञांचं पथक घरोघरी जाणार

‘डिप्रेशनमुक्त मुंबई’साठी नायर रुग्णालयाकडून सर्वेक्षण, वैद्यकीय तज्ज्ञांचं पथक घरोघरी जाणार

Subscribe

Depression-free Mumbai | सदर सर्वेक्षणाच्या माध्यमातून मानसिक आजारांचे प्रमाण ठरवून त्यानुसार, मानसोपचार यंत्रणा उभारणी व तिचे बळकटीकरण करण्याची गरज निश्चित करणे, यासाठी हे सर्वेक्षण अतिशय महत्त्वाचे ठरणार आहे.

Depression-free Mumbai | मुंबई – केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने देशातील महानगरांमधील मानसिक आजाराने त्रस्त रुग्णांची परिस्थिती जाणून घेण्यासाठी २०१५- १६ मध्ये केलेल्या सर्वेक्षणाला चांगले यश मिळाले होते. आता दुसरे सर्वेक्षण हाती घेण्यात आले आहे. यामध्ये मुंबई, दिल्ली, हैद्राबाद, बंगळुरु, चेन्नई व कोलकाता या महानगरांमध्ये हे सर्वेक्षण राबवण्याचे निश्चित केले आहे. मुंबईतील सर्वेक्षणासाठी नायर रुग्णालयाची निवड करण्यात आली आहे. (For ‘depression-free Mumbai’, a survey by Nair Hospital, a team of medical experts will go door to door)

सदर सर्वेक्षणामध्ये विशेष सॉफ्टवेअरद्वारे निवडलेल्या ३ हजार ६०० व्यक्तींची घरोघरी जाऊन वैद्यकीय तज्ज्ञांचे पथक सुमारे ३० ते ४० मिनिटे मुलाखत घेत आहेत. हे सर्वेक्षण सप्टेंबर २०२३ पर्यंत पूर्ण करण्याचा पालिकेचा मानस आहे. हे सर्वेक्षण करण्याच्या दृष्टीने मुलाखतीसाठी आपल्या घरी कर्मचारी आल्यास त्यांना नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन यानिमित्ताने करण्यात आले आहे. सदर सर्वेक्षणाच्या माध्यमातून मानसिक आजारांचे प्रमाण ठरवून त्यानुसार, मानसोपचार यंत्रणा उभारणी व तिचे बळकटीकरण करण्याची गरज निश्चित करणे, यासाठी हे सर्वेक्षण अतिशय महत्त्वाचे ठरणार आहे.

- Advertisement -

हेही वाचा – महापालिकेच्या अर्थसंकल्पात मुंबईकरांना मोठा दिलासा; आरोग्य विभागात ६ हजार कोटींची तरतूद

वास्तविक, केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयातर्फे देशातील पहिले राष्ट्रीय मानसिक आरोग्य सर्वेक्षण सन २०१५-१६ मध्ये करण्यात आले होते. त्यासाठी राष्ट्रीय मानसिक आरोग्य आणि मज्जासंस्था विज्ञान या संस्थेची मध्यवर्ती समन्वय केंद्र म्हणून निवड करण्यात आली होती. देशातील १२ राज्यांच्या सहभागाने त्यावेळी सर्वेक्षण करण्यात आले होते. त्यांनी केलेल्या सर्वेक्षणानुसार, मनोविकारांचे आजीवन प्रमाण हे शहरी भागात १४ टक्के तर ग्रामीण भागात १० टक्के इतके आढळले होते. ज्यात चिंता (नर्व्हस्), नैराश्य (मूड डिसऑर्डर), अति मद्य सेवन यांचा समावेश होता. यातील बहुतेक आजारांसाठी उपचारांची गरज व प्रत्यक्ष उपलब्धता यातील तफावत ६० टक्क्यांहून अधिक आढळली होती. औषधे, मानसोपचारतज्ज्ञ, मानसशात्रज्ज्ञ व मानसोपचार परिचारिका यांची मोठी कमतरता सर्वच राज्यांमध्ये आढळून आली होती.
पहिल्या सर्वेक्षणामध्ये आढळलेली ही निरीक्षणे लक्षात घेऊन मुंबईतील सर्वेक्षणासाठी पालिकेच्या नायर रुग्णालयाची निवड करण्यात आली आहे. नायर रुग्णालयाचा मनोविकृतीशास्त्र विभाग व जनऔषध वैद्यकशास्त्र विभाग यांनी संयुक्तपणे हे सर्वेक्षण नुकतेच सुरु केले आहे. यासाठी वस्ती पातळीवर सर्वेक्षण करण्यासाठी १ मुख्य समन्वयक आणि ७ क्षेत्रीय कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे.

- Advertisement -

आरोग्य सेवेतील त्रुटी दूर करणार

महाराष्ट्र व मुंबईतील मानसिक आरोग्यसेवेच्या स्थितीचा नायर रुग्णालयातील मानसोपचारतज्ज्ञ, रोगप्रतिबंधक आणि सामाजिक वैद्यकशास्त्र तज्ज्ञ व पालिकेचा सार्वजनिक आरोग्य विभाग एकत्रितरित्या आढावा घेतील व आरोग्य सेवेतील त्रुटींचे प्रमाण निश्चित करतील.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -