घरताज्या घडामोडीमाजी मुंबई महापालिका आयुक्त के.नलिनाक्षन यांचा दुर्दैवी मृत्यू

माजी मुंबई महापालिका आयुक्त के.नलिनाक्षन यांचा दुर्दैवी मृत्यू

Subscribe

देवपूजा सुरु असताना लुंगीला लागले्या आगीत नलिनाक्षन ८० ते ९० टक्के भाजले होते.

माजी महानगरपालिका आयुक्त के.नलिनाक्षन यांचा गंभीर भाजल्यामुळे शुक्रवार सकाळी मसीना रुग्णालयात निधनं झालं आहे. बुधवारी घरी देवपुजा करताना अचानक त्यांच्या धोतीला आग लागली यामुळे नलिनाक्षन गंभीर स्वरुपात भाजले होते. ७९ वर्षीय नलिनाक्षन यांची रुग्णालयात उपचारादरम्यान प्राणज्योत मालवली आहे. नलिनाक्षन यांच्या मृत्यूची माहिती त्यांच्या मुलगा श्रीजीतने दिली आहे. मागील ३ दिवसांपासून नलिनाक्षन मृत्यूशी झुंज देत होते अखेर त्यांचा लढा अपयशी ठरला आहे. नलिनाक्षन यांच्या अंतिमसंस्काराबाबत अद्याप कोणतीही माहिती देण्यात आली नाही.

माजी महानगरपालिका प्रमुख के.नलिनाक्षन १९६७च्या बॅचचे आईएएस अधिकारी आहेत. ते कोझीकोड येथील रहिवासी आहेत. नलिनाक्षन यांनी १९९९ ते २००१ या कालावधीत मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त आणि त्या नंतर मंत्रालयात परिवहन आणि उत्पादन शुल्काचे अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून काम पाहिले आहे. त्यावेळी नलिनाक्षन चर्चगेट येथील चार्लव्हील अपार्टमेंटमध्ये वास्तव्यास होते.

- Advertisement -

नलिनाक्षन यांच्या निधनाची माहिती त्यांचा मुलगा श्रीजीतने दिली आहे. श्रीजीतने एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे की, माझ्या वडिलांनी कधीही देव पूजा चुकवली नाही. दररोज सकाळी ते पूजा करायचे. बुधवारी सकाळी देव पूजा करत असताना त्यांच्या लुंगीला जळत्या कापूरमुळे आग लागली. त्यावेळी माझी आई आणि नोकर घरी होते परंतु देवघराचा दरवाजा आतून बंद होता. ज्यावेळी त्यांना काही घडलं असल्याची जाणीव झाली तेव्हा उशीर झाला होता. वडिलांनी पट्टा घातला असल्यामुळे त्यांना लुंगी काढणे शक्य झाले नाही.

वडील गंभीर भाजल्यामुळे त्यांना भायखळ्यातील मसिना रुग्णलयातील अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले होते. पहिल्या दिवशी त्यांची प्रकृती स्थिर होती परंतू नंतर त्यांची प्रकृती खालावली होती. उपाचारादरम्यान शुक्रवारी त्यांचं निधन झाले असल्याची प्रतिक्रिया त्यांच्या मुलाने दिली आहे. श्रीजीतने सांगितले की, त्याचे नलिनाक्षन ८० ते ९० टक्के भाजले होते. त्याच्या पश्चात पत्नी, तीन मुले, नातवंड आणि सून असा परिवार आहे. त्यांचा एक मुलगा नोकरीसाठी हॉंग काँगमध्ये असतो यामुळे त्यांच्या अंत्यसंस्काराबाबत अधिकृत माहिती देण्यात आली नाही.

- Advertisement -

मुंबईत त्यांच्या कामाची आठवण

के. नलिनाक्षन हे मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदावर कामकाज पाहताना छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्थानक येथील भुयारी मार्ग बांधण्यात आला आहे. यावेळी या भुयारी मार्गाच्या प्रवेश द्वारात त्यांच्या नावाची कोनशीला लावण्यात आलेली आहे. या कोनाशीलाच्या रुपाने आणि भुयारी मार्गाच्या निमित्ताने आजही त्यांची आठवण काढण्यात येते.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -