चार समाजाची नवीन महामंडळे आणि टेंट सिटीचे गिफ्ट; असाही अर्थसंकल्प

असंघटित कामगारांसाठी महाराष्ट्र राज्य असंघटित कामगार कल्याण मंडळ, लिंगायत तरुणांना रोजगार देण्यासाठी जगदज्योती महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ, गुरव समाजासाठी संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळ, रामोशी समाजासाठी राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळ आणि वडार समाजासाठी पैलवान कै. मारूती चव्हाण-वडार आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यात आले आहे.

devendra fadnavis 1

 

Maharashtra Assembly Budget 2023 | मुंबई – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात नवीन पाच महामंडळांची घोषणा करण्यात आली आहे. लिंगायत, गुरव. रामोशी, वडार अशा चार समाजाच्या उन्नतीसाठी ही नवीन महामंडळे आहेत. तर असंघिटत कामागारांना दिलासा देण्यासाठी एक महामंडळ स्थापन करण्यात आले आहे. पर्यटनाला चालना देण्यासाठी १० पर्यटन स्थळांवर टेंट सिटी उभारण्यात येणार आहे. त्यासाठीही अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली आहे.

असंघटित कामगारांसाठी महाराष्ट्र राज्य असंघटित कामगार कल्याण मंडळ, लिंगायत तरुणांना रोजगार देण्यासाठी जगदज्योती महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ, गुरव समाजासाठी संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळ, रामोशी समाजासाठी राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळ आणि वडार समाजासाठी पैलवान कै. मारूती चव्हाण-वडार आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यात आले आहे. या महामंडळांना प्रत्येकी ५० कोटी रुपयांचा निधी दिला जाणार आहे. ही महामंडळे महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त व विकास महामंडळांतर्गत काम करणार आहेत.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सादर केला. त्यात त्यांनी प्रत्येक समाजाच्या विकासासाठी निधी जाहिर केला. त्यानुसार लिंगायत, गुरव. रामोशी, वडार समाजााठी स्वतंत्र मंडळे स्थापन करण्यात आली आहेत. तसेच असंघटीत कामगारांच्या कुटुंबासाठी. त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी खास मंडळ तयार करण्यात आले आहे.

तर पर्यटन विकासासाठीही अर्थसंकल्पात तरतुद करण्यात आली आहे. जल, कृषी, कॅराव्हॅन, साहसी पर्यटनाचे विशेष प्रशिक्षण युवकांना देण्यात येणार आहे. प्रत्येच जिल्ह्यातील ५०० युवकांना हे प्रशिक्षण मिळणार आहे. पर्यटकांचे स्वागत कसे करावे. त्यांचा आदर कसा करावा याचेही खास प्रशिक्षण दिले जाणार आहे, अशी घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आली आहे.

तसेच दहा पर्यटन स्थळांवर टेंट सिटी उभारली जाणार आहे. जेणेकरुन पर्यटकांना निसर्गाचा आनंद घेता येणार आहे. राज्याचा वार्षिक महोत्सव आराखडा तयार केला जाणार आहे. शिवनेरी येथे होणारा शिवजन्मोत्सव, जव्हार येथील भगवान बिरसा मुंडा महोत्सव, नांदेड येथील वीर बाल दिवस महोत्सव आदिंचा या आराखड्यात समावेश करण्यात आला आहे.   नागपूर फुटाळा तलावाच्या धर्तीवर पैठण येथील संत ज्ञानेश्वर उद्यानाचा विकास केला जाणार असल्याचेही वित्तमंत्री फडणवीस यांनी जाहिर केले.