घरदेश-विदेशथलैवा पुन्हा राजकारणात? आज मोठी राजकीय घोषणा करण्याची शक्यता

थलैवा पुन्हा राजकारणात? आज मोठी राजकीय घोषणा करण्याची शक्यता

Subscribe

सुपरस्टार रजनीकांत तामिळनाडू विधानसभा निवडणूक लढवण्याच्या तयारीत?

तामिळनाडूमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केलेल्या दौऱ्यानंतर तामिळनाडूच्या राजकीय वातावरणात आणि राजकारणात निवडणुकीसंबंधी चर्चेला उधाण आलं आहे. त्यामुळे तमिळनाडूतील राजकीय पक्ष निवडणुकींच्या संदर्भात सक्रिय झाल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र आगामी वर्षात होणाऱ्या निवडणुकांमध्ये थलैवा अर्थात रजनीकांत निवडणूक लढवणार का? अशा चर्चा रंगण्यास सुरूवात झाली आहे. यामागचं कारण म्हणजे तमिळनाडू विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रजनीकांत यांनी चेन्नई येथे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेतली. यासंदर्भात रजनीकांत लवकरच आपल्या राजकीय पक्षाची भूमिका ठरवत २०२१ मध्ये होणारी तामिळनाडू विधानसभा निवडणूक लढण्याची घोषणा करु शकतात.

- Advertisement -

दरम्यान, बैठकीनंतर रजनीकांत निवडणूक लढणार की नाही यासंबंधी अधिकृत घोषणा करण्याची शक्यता आहे. रजनीकांत गेल्या २ वर्षांपासून राजकारणात सक्रीय आहेत. मात्र रजनीकांत यांनी अधिकृतपणे राजकारणात प्रवेश केलेला नाही. तमिळनाडूमध्ये पुढच्या वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणूकीपूर्वी दक्षिणात्य चित्रपटांतील सुपरस्टार रजनीकांत यांच्या राजकारणातील प्रवेशाबाबत वक्तव्य समोर आले आहे. यावरूनच असे रजनीकांत विधानसभा निवडणूक लढवू शकतात, असे संकेत मिळाले आहे.

तसेच, तमिळनाडूतील सर्व राजकीय पक्षांची नजर आज होणाऱ्या रजनीकांत यांच्या संघटनेच्या बैठकीवर आहे. कारण या बैठकीनंतरच रजनीकांत पुढल्या वर्षी होणारी तमिळनाडू विधानसभा निवडणूक २०२१ लढवणार की नाही, हे स्पष्ट होणार आहे. रजनीकांत गेल्या एक-दोन वर्षांपासून राजकारणात सक्रीय आहेत. मात्र अद्याप अधिकृतपणे त्यांनी राजकारणात तरी प्रवेश केलेला नाही. गेल्या वर्षी अभिनेता कमल हसन आणि रजनीकांत यांनी एकत्र काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानंतर हे दोघेही एकत्र राजकारणात सक्रीय होणार असल्याची चर्चा रंगली असून राजकारणात खळबळ निर्माण झाली होती.


मुंबईत ‘या’ ठिकाणी होणार कोरोना लसींचं कोल्ड स्टोरेज
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -