घरताज्या घडामोडीनेत्यांनी बोलताना पथ्य पाळावीत, गिरीश बापट यांचा नारायण राणेंना घरचा आहेर

नेत्यांनी बोलताना पथ्य पाळावीत, गिरीश बापट यांचा नारायण राणेंना घरचा आहेर

Subscribe

सामान्य जनतेला आवडते. तेच चांगले असून आपल्याला ते करायला हवं - गिरीश बापट

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात केलेल्या वक्तव्यावर अनेक राजकीय नेते मंडळी आपली प्रतिक्रिया देत आहेत. भाजपच्या नेत्यांकडून राणेंना पाठिंबा देण्यात आला आहे मात्र त्यांच्या वक्तव्याचे कोणीही समर्थन केलं नाही. राजकीय नेत्यांनी बोलताना पथ्य पाळावात असे म्हणत भाजप नेते गिरीश बापट यांनी नारायण राणे यांना घरचा आहेर दिला आहे. नारायण राणेंच्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात भाजप आणि शिवसेनेमधील वातावरण कमालीचं तापलं आहे. नारायण राणे यांनी शिवसेनेच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली असून जुन्या प्रकरणांवर एकमेकांवर आरोप करण्यात येत आहे. गिरीश बापट यांनी या सर्व प्रकरणावर प्रतिक्रिया देताना राणेंना चांगलाच टोला लगावला आहे.

भाजप नेते गिरीश बापट यांनी नारायण राणेंच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. बापट यांनी म्हटलं आहे की, राजकीय पक्षात मतभेद असतात. पण सर्वच पक्षांच्या नेत्यांनी बोलताना पथ्य पाळली पाहिजे. सामान्य जनतेला अशी वक्तव्ये आवडत नाहीत. यामुळे जे सामान्य जनतेला आवडते. तेच चांगले असून आपल्याला ते करायला हवं. यामुळे एकमेकांवर कुरघोडी करण्यापेक्षा जनतेत जाऊन जनतेची कामं आपण करु. मुख्यमंत्री असो किंवा नारायण राणे यांनी आपापली मत मांडायला आमची हरकत नाही. परंतु अनेक गोष्टी या अडचणीच्या आहेत त्यांचे रुपांतर नको त्या गोष्टीत होते यामुळे आपण सगळ्यांनी ते टाळलं पाहिजे अशी प्रतिक्रिया गिरीश बापट यांनी दिली आहे.

- Advertisement -

राणे नेमकं काय म्हणाले होते?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी केलेल्या भाषणावर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पत्रकार परिषदेत टीका केली होती. यावेळी नारायण राणे यांनी वादग्रस्त विधान केलं. “त्या दिवशी नाही का? किती वर्षे झाली देशाला स्वातंत्र्य मिळून.. अरे हिरक महोत्सव काय? मी असतो तर कानाखालीच चढवली असती” असे नारायण राणे यांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे भाषण करत असताना हिरक महोत्सव का अमृत महोत्सव यावरुन आपल्या स्वीय सहायकाला विचारलं होते. स्वातंत्र्य मिळून किती वर्ष झाली हे मुख्यमंत्र्यांना आठवणीत नसल्यामुळे नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली होती.


हेही वाचा : दिशा सालियानची बलात्कार करुन हत्या, सगळं बोललो तर परवडणार नाही; राणेंचा इशारा

- Advertisement -

 

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -