Eco friendly bappa Competition
घर ताज्या घडामोडी Go First : गो-फर्स्ट विमान कंपनीचे 200 वैमानिक एअर इंडिया कंपनीत रुजू!

Go First : गो-फर्स्ट विमान कंपनीचे 200 वैमानिक एअर इंडिया कंपनीत रुजू!

Subscribe

गो-फर्स्ट विमान कंपनीचे 200 वैमानिकएअर इंडिया कंपनीत रुजू झाल्याची माहिती समोर येत आहे. आर्थिक गर्तेत अडकल्याने गो-फर्स्ट विमान कंपनीला तोट्याचा सामना करावा लागत आहे. मात्र आता या गो-फर्स्ट विमान कंपनीतील 200 वैमानिक एअर इंडियात रुजू झाले असून त्यापैकी 75 वैमानिकांचे प्रशिक्षण सुरू झाले आहे.

गो-फर्स्ट विमान कंपनीचे 200 वैमानिक एअर इंडिया कंपनीत रुजू झाल्याची माहिती समोर येत आहे. आर्थिक गर्तेत अडकल्याने गो-फर्स्ट विमान कंपनीला तोट्याचा सामना करावा लागत आहे. मात्र आता या गो-फर्स्ट विमान कंपनीतील 200 वैमानिक एअर इंडियात रुजू झाले असून त्यापैकी 75 वैमानिकांचे प्रशिक्षण सुरू झाले आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत जर गो-फर्स्ट कंपनी पुन्हा सुरू झाली तर त्यांना वैमानिकांची कमतरता भासण्याची शक्यता निर्माण झाली आहे. (go first 200 pilots joins air India 75 under training earlier company offers more salary)

मिळालेल्या माहितीनुसार, 2 मेपासून गो-फर्स्ट कंपनीची सेवा अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आली आहे. त्यातच कर्मचाऱ्यांच्या पगारामध्येदेखील विलंब झाल्यामुळे विविध विभागातील कर्मचाऱ्यांनी अन्य विमान कंपन्यांकडे मोर्चा वळविला आहे. यामध्ये वैमानिकांची संख्या मोठी सर्वाधिक असल्याचे समजते.

- Advertisement -

हेही वाचा – अखेर एअर इंडिया इमारतीची विक्री; ‘इतक्या’ कोटींची ऑफर

काही दिवसांपूर्वीच एअर इंडिया कंपनीने वैमानिकांसाठी वॉक इन मुलाखत घेतली होती. या मुलाखतीमध्ये गो-फर्स्ट विमान कंपनीच्या अनेक वैमानिकांनी हजेरी लावली होती. त्यातूनच अनेक जणांची निवड करण्यात आल्याची माहिती मिळते. कर्मचाऱ्यांची होणारी गळती रोखण्यासाठी गो-फर्स्टने नुकतेच नवीन पॅकेज जाहीर केले. तसेच, वैमानिकांना त्यांच्या महिन्याच्या पगाराखेरीज प्रति महिना 1 लाख रुपये तर को-पायलटला 50 हजार रुपये देण्याची घोषणा केली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – एअर इंडिया : विमानातील गैरवर्तणुकीच्या घटनांना बसणार आळा; ‘या’ सॉफ्टवेअरद्वारे करणार कारवाई

गो-फर्स्ट विमान कंपनीने नवीन पॅकेज जाहीर केले असले तरी, कंपनीच्या भविष्याबद्दल अस्थिरतेचे संकट कायम आहे. त्यामुळे अनेक कर्मचारी नव्या नोकरीच्या शोधात आहेत. भारतीय विमान क्षेत्रामध्ये सध्या मोठ्या प्रमाणावर विस्ताराच्या संधी निर्माण झाल्या असून गो-फर्स्टमुळे अन्य विमान कंपन्यांना आणखी संधी मिळाली आहे. 2024 मध्ये इंडिगो कंपनीला आणखी 5 हजार कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे तर अकासा एअर कंपनी आणखी एक हजार कर्मचाऱ्यांची भरती करण्याच्या तयारीत आहे. एअर इंडिया कंपनीला देखील 900 नवे वैमानिक यावर्षी हवे असून 4 हजार 200 केबिन कर्मचारी हवे आहेत.

- Advertisment -