Goa election 2022 : फडणवीसांना माझा शब्द कितीही नोटा टाकल्या तरी…, संजय राऊतांचे थेट आव्हान

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांच्यावर निशाणा साधला होता. याला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

sanjay raut slams bjp leader chandrakant patil over cm pm meeting
चंद्रकांत पाटलांनी चष्म्याचा नंबर तपासून प्रतिमेची काळजी घ्यावी, संजय राऊतांचा पलटवार

भाजप नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस गौवा दौऱ्यावर आहेत. गोव्यात विधानसभा निवडणूकीसाठी सर्व राजकीय पक्षांची जोरात तयारी सुरु झाली आहे. गोव्यात शिवसेनेचे डिपॉझिट जप्त होऊ नये याकडे लक्ष द्यावे असा टोला फडणवीसांनी लगावला आहे. यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी रोखठोक उत्तर दिलं आहे. फडणवीस गोव्यात गेले आणि पक्ष फुटला आहे. त्यांना माझा शब्द आहे की, कितीही नोटांचा पाऊस पडला तरी शिवसेना या नोटांना पुरुन ऊरेल असे थेट आव्हानच राऊतांनी फडणवीसांना दिलं आहे.

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी राऊतांनी फडणवीसांच्या टीकेबाबत प्रश्न विचारण्यात आला यावर राऊत म्हणाले की, देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रातून गोव्यात गेले आहेत. देवेंद्र फडणवीस गेल्यानंतर भाजप फुटला आहे. काल एक मंत्री मायकल लोबो यांनी पक्षाचा त्याग केला आहे. तेव्हा फडणवीसांनी आपल्या पक्षांतर्गत जे काही युद्ध सुरु आहे. ती लढाई करावी असा पलटवार राऊतांनी फडणवीसांवर केला आहे.

फडणवीसांना माझा शब्द कितीही नोटा टाका

‘प्रश्न नोटांचा म्हणत आहेत. ते त्यांनी बरोबर म्हटलं आहे. आमची लढाई खर तर नोटांशीच आहे. भाजपचे लोकं ज्या प्रकारे निवडणुकीत नोटांचा पाऊस पाडत आहेत. गोव्यात महाराष्ट्रातून बॅगा जात आहेत. त्याच्यामुळे शिवसेनेसारखा पक्ष गोव्यात त्या नोटांशी नक्की लढेल आणि गोव्यातील जनतेला सांगणार आहे की, नोटांच्या दबावात येऊ नका. शिवसेना हा सामन्यांचा बहुजनांचा पक्ष आहे. हिंदुत्ववादी पक्ष आहे. त्यामुळे भाजपच्या नोटांना शिवसेना पुरुन उरेल हे नक्की आहे. फडणवीसांना माझा शब्द आहे. कितीही नोटा टाका आम्ही नोटांशी लढू’ असा घणाघात संजय राऊतांनी केला आहे.

तुमच्या सारख्या टेकाड्यांची हिमालयाशी स्पर्धा होणार नाही

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांच्यावर निशाणा साधला होता. याला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उत्तम काम करत आहेत. पंतप्रधानांच्यासोबत ते बैठकीला उपस्थित राहतील. शरद पवारांसारखी उंची राजकारणात आणि समाजकारणात कोणाची नाही. एखादा व्यक्ती पंतप्रधान झाला तर तो मोठा होत नाही. तुमच्या सारख्या टेकाड्यांना हिमालय किंवा सह्याद्रीच्या उंचीशी स्पर्धा करता येणार नाही असा हल्लाबोल संजय राऊतांनी चंद्रकांत पाटलांवर केला आहे.


हेही वाचा : शरद पवार पंतप्रधान होणार का?; चंद्रकांत पाटलांच्या प्रश्नावर संजय राऊतांचे रोखठोक उत्तर