घरताज्या घडामोडीकाळजी नको! लवकरच वयोवृद्ध लोककलावंतांचे मानधन खात्यात जमा होणार

काळजी नको! लवकरच वयोवृद्ध लोककलावंतांचे मानधन खात्यात जमा होणार

Subscribe

शासनातर्फे वृद्ध कलावंतांसाठी शासकीय मानधनाची योजना राबवली जाते. या योजनेतंर्गत कलावंतांना दर्जानुसार मानधन दिले जाते. मात्र गेले ३ महिने या कलावंतांना मानधन मिळाले नव्हते. गेले अनेक दिवसांपासून सरकारी मानधनाकडे डोळे लावुन बसलेल्या  वयोवृद्ध लोककलावंताचे तीन महिन्याचे थकीत मानधन येत्या आठवडयात आपल्या बँक खात्यात जमा होणार आहे. सुमारे २७ हजार वयोवृद्ध कलावंताना याचा लाभ मिळणार आहे.

कोरोनानावाचं संकंट केवळ देशावर नाही तर जगावर कोसळलं आहे. त्यामुळे सध्या लोककलावंतांचे कार्यक्रम बंद आहेत. सरकारच्या आर्थिक परिस्थितमुळे  गेले अनेक महिन्यापासून वयोवृद्ध लोककलावंताना वेळेवर मानधन मिळत नसल्याने अनेक गरीब लोकलावंतांकडे आज घडीला औषधे घ्यायला सुद्धा खिशात पैसे नाहीत. महाराष्ट्रातील लोकलावंतांवर आज उपासमारीची परिस्थिती ओढवली आहे. सगळ्यांचेच कार्यक्रम बंद असल्याने आता कोणी कलावंत एकमेकांच्या मदत करायला तयार नाहीत. त्यातच डिसेंबर महिन्यापासून सांस्कृतिक खात्याकडून या वयोवृद्ध लोककलावंताचे हक्काचे मिळणारे मानधन त्यांच्या खात्यात जमा केले नसल्याने वयोवृद्ध कलावंतामध्ये प्रचंड नाराजी पसरली होती.

- Advertisement -

पण आता कलावंतांना काळजी करण्याची गरज नाही. कारण दोन दिवसांपूर्वी वित्त विभागाने सांस्कृतिक कार्य खात्याला १३ कोटी रुपये वयोवृद्ध कलावंताचे थकीत मानधन देण्यासाठी निधी वितरित केला आहे.त्यामुळे येत्या आठवड्याभरात सुमारे २७ हजार वयोवृद्ध कलावंताचे डिसेंबर, जानेवारी आणि फेब्रुवारी या तीन महिन्यांचे थकीत मानधन आपल्या बँकेत जमा होणार आहे.

सुधारीत वाढीनुसार मानधन

सप्टेंबर २०१९पासून सुधारित शासन निर्णयानुसार वयोवृद्ध कलावंताच्या मानधनात वाढ झालेली असून “अ”श्रेणीतील वयोवृद्ध कलावंताला तीन हजार,१५०रुपये, “ब”श्रेणी साठी-दोन हजार,७००रुपये आणि “क”श्रेणीतील लाभार्थ्यांना दोन हजार,२५०रुपये मानधन मिळणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -