गोपीचंद पडळकरांचा प्रकाशकांना ठेंगा, पुस्तक काढूनही दिले नाहीत पैसे

Gopichand Padalkar did not announce the donation and did not pay, said Hari Narke

संजय सोनवणी हे सिद्धहस्त लेख असून त्यांनी होळकर घराण्याचा इतिहासावर काम केले आहे. त्यांच्या एका पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात आमदार गोपीचंद पडळकर भेटले होते. अनेक अडचणींमधून हे पुस्कर प्रकाशित केल्याचे बघून पडळकरांनी उत्स्फूर्तपणे पुस्तकाच्या प्रकाशनाचा खर्च आपण देणगी म्हणून देत असल्याची घोषणा केली केली होती. मात्र, पुढे एक वर्ष उलटूनही प्रकाशकांना पडळकर यांच्याकडून एक रुपयाही मिळाला नाही, असे मत हरी नरके यांनी मांडले आहे.

त्या गोष्टीला ही 6 महिने पूर्ण –
या क्रार्यक्रमाला गणपतराव देशमुखही उपस्थित होते. पुढे पडळकर व्हाय वंचित बहुजन आघाडी भाजपमध्ये गेले. त्यांना विधानपरिषदेत आमदारकी मिळाली. मध्यंतरी एका वाहिनीच्या कार्यालयात त्यांची अचानक भेट झाली. मी त्यांना या पुस्तकाच्या देणगीची आठवण करून दिली. आठवड्यात पूर्तता करतो असे, ते म्हणाले. यालाही आता सहा महिने झाले.

या प्रसंगाची सांगीतली आठवण –

गोपीचंद पडळकर यांच्या या प्रकरणावरून एका नेत्यांची आठवण झाली. अशाच एका पुस्तक प्रकाशनाच्या आधी आपण त्याच्या पाच हजार प्रती आगाऊ नोंदणी करून खरेदी करू, असे ते लेखक, प्रकाशकांना म्हणाले. प्रत्यक्ष कार्यक्रमात सभागृहाबाहेर पुस्तक विक्री चालू असताना त्याची एकही प्रत त्यांनी विकत घेतली नाही. उलट तेच लेखकाकडे भेट प्रत मागायला आले. तेव्हा मी त्यांना, पाच हजार प्रती घेण्याचे काय झाले असे विचारले तेव्हा ते म्हणाले, उद्यापरवा घेतो. तो नंतर कधी उगवलाच नाही. या घोषणेचा आणखी एक तोटा असा झाला की काही कार्यकर्त्यांनी प्रत्येकी दहादहा प्रती खरेदी करून राज्यात व बाहेर अगदी विदेशातही हे पुस्तक पाठवण्याचे ठरवले होते. त्यांना वाटले काम झाले.