घरमहाराष्ट्रदहा हजार पदवीधर मतदारांसाठी पडळकरांचे निवडणूक आयोगाला पत्र

दहा हजार पदवीधर मतदारांसाठी पडळकरांचे निवडणूक आयोगाला पत्र

Subscribe

येत्या ३० जानेवारीला पदवीधर मतदारसंघाची निवडणूक आहे. त्याच दिवशी पदवीधरांच्या परीक्षा आहेत. त्यामुळे दहा हजार पदवीधर मतदारांना मतदान करता येणार नाही. निवडणूक व पदवीधरांच्या भवितव्यावर याचा परिणाम होऊ शकतो. याची गंभीर दखल निवडणूक आयोगाने घ्यायला हवी. यावर सकारात्मक तोडगा काढावा, अशी मागणी पडळकर यांनी पत्रात केली आहे.

मुंबईः पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी होणारे मतदान व पदवीधरांच्या विविध गटातील परीक्षा एकाच दिवशी आल्या आहेत. त्यामुळे दहा हजार मतदारांना मतदान करता येणार नाही. या मुद्द्यावर योग्य तो तोडगा काढावा, अशी मागणी करणारे पत्र भाजपचे विधानपरिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी निवडणूक आयोगाला लिहिले आहे.

येत्या ३० जानेवारीला पदवीधर मतदारसंघाची निवडणूक आहे. त्याच दिवशी पदवीधरांच्या परीक्षा आहेत. त्यामुळे दहा हजार पदवीधर मतदारांना मतदान करता येणार नाही. निवडणूक व पदवीधरांच्या भवितव्यावर याचा परिणाम होऊ शकतो. याची गंभीर दखल निवडणूक आयोगाने घ्यायला हवी. यावर सकारात्मक तोडगा काढायला हवा, अशी मागणी पडळकर यांनी पत्रात केली आहे.

- Advertisement -

भारत हा युवकांचा देश आहे. पदवीधर युवकांच्या भवितव्याची दिशा ठरवण्याचे काम पदवीधर आमदार करत असतात. जगातील सर्वात मोठी लोकशाही अशी भारताची ओळख आहे. लोकशाहीत निवडणुकीला महत्त्वाचे स्थान आहे. कोणत्याही व्यक्तिला निवडणुकीपासून वंचित ठेवणे हे अन्याय करण्यासारखे आहे. हा अन्याय निवडणूक आयोगाने होऊ देऊ नये, असे पडळकर यांनी पत्रात नमूद केले आहे.

नगरविकास, विधी व न्याय, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये , सार्वजनिक आरोग्य या विभागांच्या गट ‘अ’ आणि ‘ब’ साठी विविध विभागांच्या परीक्षा होणार आहेत. या परीक्षांसाठी राज्यातील विविध ठिकाणी केंद्रे देण्यात आली आहेत. दोन सत्रात या परीक्षा होणार आहेत. परीक्षांमुळे पदवीधर मतदारांना मतदान करता येणार नाही, याकडेही पत्रात लक्ष वेधण्यात आले आहे.

- Advertisement -

दरम्यान गेल्या आठवड्यात पडळकर यांनी शरद पवार यांच्यावर निशाणा साधला. महाविकास आघाडीची सत्ता गेल्यानंतर इतकी चुळबुळ निर्माण झाली आहे की शरद पवार यांच्या घरातच उभी फूट पडते की काय असे वातावरण राज्यात निर्माण आहे. तुम्ही राज्यातली एवढी घर फोडली आहे, त्यामुळे जे पेरलं तेच उगवणार आहे. निवडणुकीत राष्ट्रवादी आणि काँग्रेसला घरी बसवल्याशिवाय राहणार नाही. एखाद्या रुग्णाला संधिवात झाल्यावर सूज येते. तशी सूज राष्ट्रवादीला गेल्या अडीच वर्षांत आली होती, पण सरकार गेल्यानंतर ती सूज आता एका झटक्यात ओसरुन गेली आहे, अशी टीका पडळकर यांनी शरद पवार यांच्यावर केली.

 

Amar Mohite
Amar Mohitehttps://www.mymahanagar.com/author/amar-mohite/
गेली १७ वर्षे पत्रकारितेत कार्यरत, न्यायालयीन निकाल आणि सुनावणीवर लिहिण्याची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -