घरमहाराष्ट्रशासकीय तांत्रिक विद्यालयाला घरघर

शासकीय तांत्रिक विद्यालयाला घरघर

Subscribe

अपुरा कर्मचारी वर्ग, इमारतीकडे दुर्लक्ष

येथील शासकीय तांत्रिक विद्यालयाला घरघर लागली असून, अपुरा कर्मचारी वर्ग, इमारतीच्या दुरुस्तीसाठी निधीची कमतरता अशा विविध कारणांमुळे विद्यालय अखेरच्या घटका मोजत आहे. तांत्रिक विद्यालये आय. टी. आय. ला जोडण्याच्या शासनाच्या विचाराधीन असल्याने याकडे दुर्लक्ष होतेय का, असाही प्रश्न उपस्थित झाला आहे.

कौशल्य विकासावर आधारित शिक्षण घेता यावे म्हणून शासनाच्या कौशल्य विकास आणि उद्योग विभागाकडून शासकीय तंत्रशास्त्र विद्यालये सुरु करण्यात आली होती. येथे १९५५-५६ साली शासकीय तंत्रशास्त्र विद्यालय सुरू करण्यात आले. यामध्ये ८ वी ते १० वीपर्यंतचे शिक्षण घेताना इतर व्यावसायिक शिक्षण देण्यात येत होते. यामध्ये वाहन दुरुस्ती, इलेक्ट्रॉनिक आणि इलेक्ट्रीकल तंत्रज्ञान याचा समावेश करण्यात आला होता. १९९९ पासून यामध्ये बदल करून पुढील ११ वी आणि १२ वी प्रवेश देखील याच तत्त्वावर देण्यात आले. यामुळे व्यावसायिक शिक्षणाची संधी आणि आवड निर्माण होऊन पुढील रोजगाराचा प्रश्न सुटण्यास मदत होते, शिवाय पुढील शिक्षणासाठीदेखील सहज प्रवेश उपलब्ध होतो.

- Advertisement -

या इमारतीची देखभाल दुरुस्ती सार्वजनिक बांधकाम विभागाकडे आहे. जवळपास ७ एकरमध्ये शासकीय तंत्रशास्त्र विद्यालय आणि आय. टी. आय. ची इमारत उभी करण्यात आली आहे. यामध्ये २४६६७०.४४ चौरस मीटर मध्ये इमारतीचे बांधकाम आहे. गेल्या काही वर्षात किरकोळ दुरुस्ती वगळता डागडुजी न केल्याने इमारतीची दुरवस्था झाली आहे. विद्यालयात ८ वी ते १० आणि पुढे ११ वी, १२ वीचे देखील शिक्षण दिले जाते. यामध्ये सध्या १८० प्रवेश क्षमता असून, सध्या केवळ १४१ प्रवेश झाले आहेत. ११ वी आणि १२ वीची प्रवेश क्षमता ७५ असली तरी ४७ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.
शासकीय तंत्रशास्त्र विद्यालयाला एकूण २४ कर्मचारी वर्ग मंजूर आहे. यामधून मुख्याध्यापक पदच रिक्त आहे. ३ निदेशकापैकी १, मुख्य लिपिक, कनिष्ठ लिपिक, भांडारपाल, पूर्णवेळ शिक्षक, पूर्णवेळ निदेशक २, वर्ग चार कर्मचारी ३, पहारेकरी आणि सफाई कामगार आदी पदे रिक्त आहेत.

शासकीय तंत्रशास्त्र विद्यालयाची अनेक पदे रिक्त आहेत. या विद्यालयाचा प्रभारी मुख्याध्यापक म्हणून पदभार सांभाळत असून, या इमारतीची दुरुस्ती अनेक वर्षांत न झाल्याने दुरवस्था झाली आहे. औद्योगिक क्षेत्रातील सी. एस. आर. किंवा दानशूर व्यक्तींकडून येथील सुधारणा लवकरच केली जाईल.
– बी. व्ही. फडतरे, प्राचार्य, आय. टी. आय., महाड

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -