घरमहाराष्ट्रसांगलीत पूर, पालकमंत्री पुण्यात

सांगलीत पूर, पालकमंत्री पुण्यात

Subscribe

पुरात अडकलेल्या सांगलीला वार्‍यावर सोडून सांगलीचे पालकमंत्री तथा सहकार मंत्री सुभाष देशमुख पुण्यात भारतीय जनता पार्टीच्या संघटनात्मक बैठकीला गुरूवारी उपस्थित राहिले. यावेळी मतदारांबरोबर संपर्क कसा ठेवायचा याबद्दल बूथकेंद्र कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी ही बैठक होती.

विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर डीपी रस्त्यावरील एका कार्यालयात ही बैठक झाली. पुण्यातील आठही विधानसभा मतदारसंघातील पक्षाचे संघटनात्मक पदाधिकारी बैठकीला उपस्थित होते. देशमुख यांच्याकडे भाजपात पुणे शहराचे प्रभारी म्हणून संघटनात्मक जबाबदारी आहे. मात्र ते पालकमंत्री असलेल्या सांगलीत पूर आला आहे. गुरुवारीच सांगलीत बोट बुडून नागरिकांच्या मृत्यूची दुर्घटना घडली. सांगलीकरांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले असून पिण्याचे पाणी, वीज, अन्न, निवारा या मुलभूत गरजांसाठी त्यांचा संघर्ष चालू आहे. अशावेळी सांगलीकरणांना मदत करण्यासाठी सांगलीत उपस्थित राहण्याऐवजी पुण्यातल्या भाजपाच्या बैठकीला देशमुखांनी प्राधान्य दिले.

- Advertisement -

सांगलीतील सरकारी यंत्रणेच्या मी सातत्याने संपर्कात आहे. आज सकाळीच मी तिथून पुण्यात आलो. संध्याकाळी पुन्हा सांगलीलाच जाणार आहे. पूरग्रस्तांसाठी मदत मिळवण्यासाठी मी पुण्यात आलो होतो. पुरग्रस्तांना सोडून मी पुण्यात आल्याच्या चर्चांमध्ये अर्थ नाही.
-सुभाष देशमुख, पालकमंत्री, सांगली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -