घरताज्या घडामोडीनाशिकसह राज्यभरात अराजकतेविरोधात सुसंवाद आंदोलन

नाशिकसह राज्यभरात अराजकतेविरोधात सुसंवाद आंदोलन

Subscribe

समविचारी कलाकार एकवटले

नाशिक : राज्यात मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष होत अराजकतेचे वातावरण निर्माण केले जात आहे. राज्यात धार्मिक तेढ निर्माण होवू नये, शांतता कायम रहावी, यासाठी राज्यभरातील कलावंत एकवटले आहेत. महाराष्ट्र दिनी रविवारी (दि. १) सकाळी ९ ते १० या वेळेत अस्वस्थता व्यक्त करण्यासाठी कलावंत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ पांढरे कपडे परिधान करुन एकत्र येणार आहेत. हातात पांढरे कापड किंवा कागद फडकावून तेआपल्या भावना व्यक्त करणार आहेत. त्याचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करणार आहेत. या संदर्भात माय महानगरकडे कलावंतांनी आपल्या भावना व्यक्त आंदोलन सहभागी होणार असल्याचे सांगितले.

 

- Advertisement -

कलावंतांच्या सुसंवाद आंदोनास पाठिंबा आहे. खरं तर जगण्याचे प्रत्येकाचे प्रश्न वेगळे आहेत. त्यात उगीचच
धार्मिक तेढ निर्माण करणे चुकीचे आहे. जनतेची दिशाभूल करणे चुकीचे आहे. मूलभूत प्रश्नांकडे प्रकाश टाकला पाहिजे. समाजात कायम शांतता असली पाहिजे. धार्मिक वाद व्हायला नकोत. आंदोलनादिवशी मुंबईत असल्याने कलावंतांसोबत आंदोलनात सहभागी होणार आहे : अनिता दाते, सिनेअभिनेत्री

सर्वांना बंधने सारखीच असली पाहिजे. नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांकडे लक्ष दिले पाहिजे. भोंगेप्रकरणी राजकारण होवू नये. नाशिकमध्ये विक्रमी तापमान वाढत असून, झाडे लावण्याकडे प्रत्येकाने लक्ष दिले पाहिजे. नाशिकमध्ये हिरवळ वाढली पाहिजे. : धनंजय वाबळे, सिनेअभिनेता

- Advertisement -

समाजात धर्मनिरपेक्ष वातावरण असले पाहिजे. धार्मिक तेढ निर्माण झाला नाही पाहिजे. सर्व सामान्य नागरिकांचे आमिषांना बळी पडू नये. : प्रिया तुळजापूरकर, सिनेअभिनेत्री

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -