घरक्रीडाShubman Gill & Elon Musk: शुभमन गिलचे एलन मस्कला ट्विट, म्हणाला स्वीगी...

Shubman Gill & Elon Musk: शुभमन गिलचे एलन मस्कला ट्विट, म्हणाला स्वीगी…

Subscribe

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलन मस्कने नुकतेच ट्विटरला ४४ अब्ज डॉलरला खरेदी केले आहे. ट्विटर आणि मस्क यांच्यातील डील २५ एप्रिलला पार पडली. अनेक युजर्सने मस्कला काही कंपन्या खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. मस्कला सल्ला देणाऱ्यांमध्ये भारतीय फलंदाज शुभमन गिलचेही नाव जोडले गेले आहे. शुभमनने स्विगी कंपनी खरेदी करण्याचा सल्ला दिला होता. शुभमनच्या या सल्ल्यावर स्वीगीनेही उत्तर दिले आहे. तर ट्विटरवर युजर्सनेही भन्नाट प्रतिक्रिया या सल्ल्यासाठी दिल्या आहेत.

शुभमन गिलने ट्वीट करत लिहिले की, एलन मस्क प्लीज स्वीगी खरेदी करा. जेणेकरून वेळेत स्वीगीची डिलिव्हरी मिळू शकेल. शुभमनने या ट्विटमध्ये एलन मस्कलाही टॅग केले आहे. एलन मस्कने या ट्विटवर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. पण स्वीगी टॅग केल्याने स्वीगीची प्रतिक्रिया या ट्विटच्या निमित्ताने आली आहे. तर ट्विटरवर युजर्सनेही शुभमन गिलची शाळा घेतली आहे.

- Advertisement -

एका युजरने कमेंट केली की, स्वीगी शुभमन गिलच्या टी २० बॅटिंगपेक्षाही अधिक वेगवान आहे. तर दुसऱ्या युजरने लिहिले की शुभमनचा स्ट्राईक रेट हा यंदाच्या आयपीएल सीजनला विराट कोहलीपेक्षा चांगला नाही. तर एका महिला फॅनने लिहिले की तुम्हाला स्वीगीची गरज काय ? तुमच्यासाठी मी जेवण तयार करू शकते.

स्वीगीनेही दिले उत्तर

ट्विट फॅन्सच्या व्यतिरिक्त शुभमन गीलच्या पोस्टला स्वीगीनेही उत्तर दिले आहे. स्वीगीने लिहिेले की, हाय शुभमन गिल, ट्विटर असो वा नसो, तुम्ही दिलेल्या ऑर्डरबाबत सर्व गोष्टी योग्य पद्धतीने व्हाव्यात हीच अपेक्षा आहे. तुमच्या ऑर्डरच्या माहितीसह आम्हाला डायरेक्ट मॅसेज करा. त्यानंतर आणखी एका मॅसेजमध्ये शुभमन गिलचा मॅसेज मिळाल्याचे स्वीगीने म्हटले आहे. तसेच यावर लवकरच कामही होईल अशीही अपेक्षा केली आहे.

- Advertisement -

गुजरात टायटन्ससोबत गिल खेळतोय

शुभमन गिल सध्या सुरू असलेल्या आयपीएल हंगामात गुजरात टायटन्सच्या टीमकडून खेळत आहे. यंदाच्या सीझनमध्ये शुभमन अतिशय चांगल्या फॉर्ममध्ये खेळत आहे. पंजाब किंग्जच्या विरोधात ९६ आणि दिल्ली कॅपिटल्स विरोधात ८४ धावांची खेळी केली आहे. तर दोन सामन्यात एकही धाव न करता शुभमन तंबूत परतला. आतापर्यंतच्या ८ सामन्यांमध्ये शुभमनने २२९ धावा केल्या आहेत. गेल्या हंगामात शुभमन गिल केकेआर साठी खेळला होता. सध्याच्या सिझनमध्ये गुजरात टायटन्सकडून खेळणाऱ्या शुभमन गिलला ८ कोटी रूपयांच्या बोलीवर संघासाठी फ्रॅंचायसीने खरेदी केले होते.

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -