घरमहाराष्ट्रHeatwave Alert: सावधान IMD कडून 'या' राज्यांना अलर्ट; काही ठिकाणी तापमान 40...

Heatwave Alert: सावधान IMD कडून ‘या’ राज्यांना अलर्ट; काही ठिकाणी तापमान 40 पार

Subscribe

अलर्टमध्ये म्हटलंय की, कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ या विभागांमध्ये काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेसदृश्य स्थिती आहे. नागरिकांनी उन्हाची तीव्रता कमी होईपर्यंत शक्यतो बाहेर पडणे टाळावे.

देशात अनेक ठिकाणी उन्हाचा तडाखा बसत आहे. राज्यांमध्ये उष्मा झपाट्याने वाढत आहे. HeatWave चा अंदाज आयएमडीने व्यक्त केला आहे. राज्यात अवकाळी पावसानंतर आता उन्हाचा तडाखा बसत आहे. अनेक शहरांचं तापमान हे चाळीस अंश सेल्सिअरच्या वर गेलं आहे.  (Heatwave Alert Caution alert from IMD to states In some places the temperature is 40 plus )

खारघरमधील महाराष्ट्र भूषण कार्यक्रमात उष्माघाताने 14 जणांना आपल्या प्राणांना मुकावं लागलं आता याच पार्श्वभूमीवर आयएमडीने काही राज्याला Heatwave चा इशारा दिला आहे.

- Advertisement -

अलर्टमध्ये म्हटलंय की, कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ या विभागांमध्ये काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेसदृश्य स्थिती आहे. नागरिकांनी उन्हाची तीव्रता कमी होईपर्यंत शक्यतो बाहेर पडणे टाळावे.

तसचं, रायगड, ठाणे, रत्नागिरी, पुणे, सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, हिंगोली, धुळे, अमरावती, नागपूर, वर्धा चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात 40 अंश सेल्सिअसच्या पुढे नोंदवले गेले आहे. त्यामुळे उन्हाची तीव्रता कमी होईपर्यंत घराबाहेर पडणे, शारिरिक कष्टाची कामे टाळावीत, असं आवाहन करण्यात आलं आहे.

- Advertisement -

( हेही वाचा: राज्यात उष्णतेची लाट: अनेक शहरांत पारा 40 अंशाच्या पुढे; जाणून घ्या कोणत्या शहरात किती तापमान )

पुढचे काही दिवस उष्णतेचे

पुढील काही दिवसांमध्ये राज्यात उष्णतेची लाट येणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. ज्यामुळे पुणे नजीकच्या भागातील तापमान 40 अंशांवर पोहोचू शकतं. त्यातच चंद्रपुरात तापमानाचा आकडा 43.6 अंशांवर पोहोचल्यामुळे उष्णतेची तीव्रता लक्षात येत आहे. पुढील काही दिवस चंद्रपुरात अशीच परिस्थिती राहणार आहे, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे. तर, तिथे वाशिमचे तापमानही 42 अंशावर पोहोचले आहे. तर परभणीचा पारा 41 अंशांपर्यंत गेला आहे. तापमानाचे हे आकडे पाहता सध्या राजय्ता सकाळच्या वेळी रस्त्यांवर नागरिकांची गर्दीही कमी दिसू लागली आहे.

अवकाळीच संकट कायम

राज्यात कडाक्याचा उन्हाळा सुरु झाला असताना काही भाग मात्र यासाठी अपवाद ठरत आहे. त्यातील एक म्हणजे पुणे. पुढचे 2 दिवस पुण्यात पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुणे वेधशाळेने हा अंदाज वर्तवला आहे. पुणे शहरासह हवामान खात्याने पुणे जिल्ह्यातील यलो अलर्ट जारी केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -