राज्यात पुढील तीन तासांत कोसळधार पावसाची शक्यता, ‘या’ जिल्ह्यांमध्ये बरसणार पाऊस

राज्यात पुढील ३ तासांत आस्मानी संकट...

मुंबई : मागील दोन दिवसांपासून राज्यांत मुसळधार पाऊस पडत आहे. हलक्या सरींचा पाऊस देखील बरसत आहे. परंतु राज्यात पुढील ३ तासांत आस्मानी संकट ओढवणार आहे. विजांच्या कडकडाटासह कोसळधार पाऊस राज्यातील काही भागांत कोसळणार आहे. मुंबई, मुंबई उपनगर आणि पालघर जिल्ह्यांत सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाचा गडगडाट असणार आहे.

येत्या तीन ते चार तासांत रत्नागिरी, पुणे, सातारा, बीड आणि परभणी या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. विजाचा धोका असल्यामुळे नागरिकांना घराबाहेर न पडण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. तसेच घरातून बाहेर पडताना नागरिकांना आपली काळजी घ्यावी, असं आवाहन हवामान खात्याकडून करण्यात आलं आहे.

राज्यात ऐन उन्हाळ्यात पावसाने पुन्हा एकदा हजेरी लावल्यामुळे शेतकरी हैराण झाले आहेत. राज्यात मध्य महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पडणार असल्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. तसेच अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे कोकण किनारपट्टीवर दयनीय स्थिती निर्माण झाली आहे.


हेही वाचा: पाकिस्तानमध्ये अल्पसंख्याकांच्या धार्मिक स्वातंत्र्याची गळचेपी, अमेरिकेने केला मोठा खुलासा…