घरमहाराष्ट्रसांगलीत पूरग्रस्त भागात बचावकार्य युद्धपातळीवर

सांगलीत पूरग्रस्त भागात बचावकार्य युद्धपातळीवर

Subscribe

३०३ जवानांकडून ३९ बोटींद्वारे मदत व बचाव कार्य सुरू

सांगली जिल्ह्यात निर्माण झालेली पूरस्थिती हाताळण्यासाठी जिल्हा प्रशासनाचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. पूरजन्य परिस्थिती हाताळण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती निवारण पथक अर्थात एनडीआरएफ, प्रादेशिक सेना म्हणजे टेरिटोरियल आर्मी, कोल्हापूर, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका पथक आणि कोस्ट गार्डच्या पथकांना पाचारण करण्यात आले आहे.


हेही वाचा – सांगलीत NDRFची बोट उलटली; ९ जणांच्या मृत्यूची भिती

या १२ पथकांचे एकूण ३०३ जवान २९ बोटींद्वारे इस्लामपूर – वाळवा, मिरज, पलूस या तालुक्यात बचाव कार्य करत आहेत. ही माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली. याशिवाय महसूल विभाग आणि जिल्हा परिषदेच्या १० बोटींद्वारे बचाव कार्य सुरू आहे.

- Advertisement -

राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकाची ८ पथके कार्यरत असून एकूण २४ कार्यान्वित बोटींद्वारे बचावकार्य सुरू आहे. या ८ पथकांतील २१९ जवान मिरज आणि पलूस तालुक्यात मदत व बचाव कार्य करत आहे. प्रादेशिक सेनेची २ पथके असून ३ कार्यान्वित बोटींद्वारे मिरज तालुक्यात ६६ जवान काम करत आहेत. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे १ पथक असून एका बोटीद्वारे इस्लामपूर तालुक्यात बचाव कार्य करत आहे. तर कोस्ट गार्डचेही १ पथक एका बोटीद्वारे १८ जवान पलूस तालुक्यात बचाव कार्य सुरू आहे.

या बचाव कार्यात दुर्दैवी घटना

या पूरस्थितीमध्ये NDRFकडून बचावकार्य सुरू होते. मात्र, आज या बचाव कार्यात दुर्दैवी घटना घडली आहे. सांगलीच्या ब्रह्मनाळमध्ये बचावकार्य सुरू असताना एका खासगी बोटीमध्ये सुमारे २७ ते ३० जणांना घेऊन जात असताना ही बोट उलटल्याने सर्वजण पाण्यात पडले. यापैकी १४ जणांना वाचवण्यात यश आले असून ९ जणांचा मृत्यू झाल्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -