आरोपीलाही त्याच वेदना झाल्या पाहीजेत; हिंगणघाट पीडितेच्या वडीलांची मागणी

court accused vikesh nagarale convicted in Hinganghat Burning Case
Hinganghat Burning Case : हिंगणघाट जळीतकांड प्रकरणात आरोपी विकेश नगराळे दोषी, उद्या निकाल जाहीर

हिंगणघाट जळीतकांडातील पीडित शिक्षिकेचा अखेर दुर्दैवी मृत्यू झाला आहे. सात दिवस पीडितेने मृत्यूशी दिलेली झुंज अखेर अपयशी ठरली. या घटनेमुळे महाराष्ट्रात हळहळ व्यक्त होत असतानाच पीडितेच्या कुटुंबियांनी आरोपी नराधमाला आमच्या स्वाधीन करा, अशी मागणी केली आहे. “ज्याप्रकारे आमच्या मुलीला वेदना झाल्या, त्याच वेदना त्यालाही झाल्या पाहीजेत”, अशी संतप्त प्रतिक्रिया पीडितेच्या वडीलांनी दिली आहे.

दिल्लीच्या निर्भया प्रकरणात अद्याप न्याय मिळालेला नाही. निर्भयाला न्याय मिळण्यास जो विलंब होत आहे. तसे आपल्या मुलीच्या बाबतीत होऊ नये, यासाठी आरोपीला ताबडतोब शिक्षा देणे गरजेचे आहे. त्यामुळे त्या नराधमाला जनतेच्या स्वाधीन करावे, त्याचे काय कराचचे ते आम्ही बघून घेऊ, असे सांगत असताना मुलीच्या वडीलांना अश्रू अनावर झाले होते.

ऑरेंज सिटी हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, रात्रीपासूनच पीडितेची तब्येत खालावली होती. त्यानंतर सकाळी ६ वाजून ५५ मिनिटांनी पीडितेचा दुर्दैवी मृत्यू झाला. तत्पूर्वी याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख आणि जिल्हाधिकारी यांना देण्यात आली आहे. मागच्या सात दिवसांत पीडितेवर उपचार करत असताना तिच्याशी हॉस्पिटलमधील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांचे देखील कौटुंबिक नाते तयार झाले होते. आज तिच्या कुटुंबाला जेवढा त्रास होतोय, तेवढाच त्रास आम्हाला देखील होतोय, अशी प्रतिक्रिया ऑरेंज सिटी हॉस्पिलच्या डॉक्टरांनी दिली.