घरताज्या घडामोडीधक्कादायक! SRPF च्या जवानांना कोरोनाची लागण

धक्कादायक! SRPF च्या जवानांना कोरोनाची लागण

Subscribe

मालेगाव येथून बंदोबस्तावरुन हिंगोलीत परतलेल्या एसआरपीएफच्या सहा जवानांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे.

मालेगाव येथून बंदोबस्तावरुन हिंगोलीत परतलेल्या एसआरपीएफच्या सहा जवानांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. हिंगोलीच्या राज्य राखीव पोलीस दलाच्या १०७ पैकी सहा जवानांना कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. दरम्यान या जवानांना सध्या क्वॉरंटाइन करण्यात आले आहे.

हिंगोली येथील राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक बारामधील १०७ अधिकारी आणि जवान मालेगाव येथून तर ८४ जवान मुंबई येथून बंदोबस्त आटोपून हिंगोलीमध्ये सोमवारी परतले होते. दरम्यान, या १९१ अधिकारी आणि जवानांचे घशातील नमुने चाचणीसाठी औरंगाबादच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पाठवण्यात आले होते. या चाचणीचे अहवाल आले असून त्यातील सहा जवानांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या या जवानांना क्वॉरंटाइन करण्यात आले आहे.

- Advertisement -

मालेगावात @ 94 : आणखी 9 रुग्ण पॉझिटिव्ह

मालेगावात कोरोनाचे थैमान सुरूच आहे. जिल्हा रुग्णालयास मंगळवारी रात्री २० रुग्णांचे रिपोर्ट मिळाले असून त्यातील मालेगावातील ९ जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. मालेगावात आता ९४ कोरोनाबाधित रुग्ण झाले असून आठ जणांचा मृत्यू झाला असून जिल्ह्यात एकूण १०८ कोरोनाबाधित रुग्ण झाले आहेत.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाकडून सर्वोतोपरी प्रयत्न केले जात आहेत. ज्या ठिकाणी कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्यानंतर त्या ठिकाणी कडक नाकाबंदी, आरोग्य तपासणी केली जात आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात प्रशासनास यश येत आहे. नाशिक जिल्ह्यात संशयित ९५१ नागरिकांच्या घशाचे नमुने घेण्यात आले आहेत. ते पुणे येथील राष्ट्रीय विषाणू प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. तर मंगळवारी रात्री २० रिपोर्ट जिल्हा रुग्णालयास मिळाले आहेत. यामध्ये ११  निगेटिव्ह रिपोर्ट नाशिकमधील असून ९ पॉझिटिव्ह रिपोर्ट मालेगावातील आहेत. यामध्ये ७ पुरुष आणि २ महिलांचा समावेश आहे.

- Advertisement -

हेही वाचा – परराज्यातील कामगारांची घरी जाण्याची इच्छा; विशेष ट्रेन सोडण्याची मागणी


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -