घरताज्या घडामोडीराणा दाम्पत्य प्यादं, काही लोकांचा राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा प्रयत्न, गृहमंत्री वळसे...

राणा दाम्पत्य प्यादं, काही लोकांचा राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा प्रयत्न, गृहमंत्री वळसे पाटलांचा आरोप

Subscribe

राज्याची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न होत आहे. ज्यांना हनुमान चालिसा पठण करायचे आहे त्यांनी आपल्या घरात हनुमान चालिसा पठण करावे. राणा दाम्पत्य केवळ प्यादं आहे. त्यांच्यात एवढी हिंमत नाही. त्यांच्या मागून कोणतरी महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न करत आहे. असा आरोप गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केला आहे. मातोश्रीसमोर हनुमान चालिसा पठण करणार असल्याचा इशारा राणा दाम्पत्याने दिला आहे. यानंतर शेकडो शिवसैनिकांनी राणा यांच्या मुंबईतील घराबाहेर घोषणाबाजी केली आहे.

राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना भाजपला इशारा दिला आहे. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था अतिशय उत्तम आहे. परंतु काही लोकं राज्यातील कायदा सुव्यवस्था बिघडले तसेच चांगली राहिली नाही अशा प्रकारे दाखवण्यासाठी वेगवेगळ्या माध्यमातून प्रयत्न करत आहेत. एखाद्या ठिकाणी दुर्दैवी घटना घडली तर लगेच मुंबईतील आणि राज्यातील कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती बिघडली असे होत नाही. त्यांनी सुद्धा ज्या पद्धतीने वर्तन केलंय ते करायला नको होते असे गृहमंत्री म्हणाले आहेत.

- Advertisement -

राणांच्या कुठल्या प्रश्नाला उत्तर द्यायचे नाही परंतु मुख्यमंत्री, गृहमंत्री असो कोणीच सुचना देत नाहीत. पोलिस आयुक्त निर्णय घेत असून कारवाई करत असतात. त्यानुसार मुंबईचे पोलीस कारवाई करत असतात. राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. काहीतरी वातवारण तयार करायचे आणि महाराष्ट्रात घटना घडवायच्या, दंगली घडवायच्या आता भोंग्याचा विषय काढून तेड निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे.

हनुमान चालिसा कोणाला वाचायची असेल तर ज्याने त्याने आपल्या घरी वाचावी. अमरावती, मुंबई किंवा दिल्लीतील घरी वाचावी, हट्ट कशासाठी केला पाहिजे की, मातोश्रीसमोर वाचायची आहे. यापूर्वी देखील वेगवेगळे प्रकार करुन विरोधकांकडून या राज्यात कायदा सुव्यवस्था राहिली नसून राष्ट्रपती राजवट लावण्यात यावी असा प्रयत्न सुरु आहे. राणा दाम्पत्य हे फक्त प्यादं आहे. त्यांच्यामागून राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न सुरु आहे. त्यांच्यात एवढी हिंमत नाही. राज्याची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न सुरु आहेत.

- Advertisement -

हेही वाचा : ॲक्शनला आम्ही रिॲक्शन देऊ शकतो, आमचे हात बांधले नाही, दरेकरांचा शिवसेनेला स्पष्ट इशारा

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -