शिवसेनेसाठी रक्ताचं पाणी केलंय; 92 वर्षांच्या आजींचा ‘मातोश्री’बाहेर पाहारा

हनुमान चालीसा पठणावरून सुरू झालेल्या वादात आता राणा दाम्पत्यांनी उडी घेतली आहे. खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या मातोश्री बाहेर हनुमान चालीस पठण करण्याचे आव्हान दिले आहे. त्यांच्या या आव्हानानंतर मातोश्री बाहेरील परिसराक जोरदार राडा रंगला आहे.

हनुमान चालीसा पठणावरून सुरू झालेल्या वादात आता राणा दाम्पत्यांनी उडी घेतली आहे. खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या मातोश्री बाहेर हनुमान चालीस पठण करण्याचे आव्हान दिले आहे. त्यांच्या या आव्हानानंतर मातोश्री बाहेरील परिसराक जोरदार राडा रंगला आहे. राणा दाम्पत्यांच्याच्या विरोधात शिवसैनिक आक्रमक झाले असून, मातोश्री बाहेर जाऊन हनुमान चालीसा पठण करण्याच्या भूमिकेवर राणा दाम्पत्य ठाम आहे. त्यामुळे राणा दाम्पत्याविरोधात शिवसैनिकांनी आक्रमक पवित्रा घेतला असून, शिवसैनिकांनी मातोश्रीबाहेर कडक सुरक्षा कवच दिलं आहे. विशेष म्हणजे या शिवसेनेच्या आंदोलनात कडवट शिवसैनिक असणाऱ्या आजी पाहायला मिळाल्या. शिवसेना आणि उद्धव ठाकरेंवर आलेले संकट दुर करण्यासाठी ‘मातोश्री’बाहेर या आजीबाई सुरक्षा कवच देऊन बसल्या आहेत.

या आजींचे वय 92 आहे. या आजींशी प्रसारमाध्यमांनी संवाद साधला असता, त्यांनी ‘मी बाळासाहेब होते तेव्हापासून शिवसैनिक आहे. तेव्हापासूनच मी मातोश्रीवर येते. साहेबांनाही भेटले होते. राणा आलेत ना, दोन दिवस त्रास देतायत मातोश्रीवर. आमच्या वहिनींना त्रास देत आहेत ना, म्हणून आम्ही शिवसैनिक त्यांना इंगा दाखवणार आहोत. तुमची हिंमत कशी झाली?”, असं त्या आजींनी म्हटलं,

माझं वय 92 वर्ष आहे. आमच्या साहेबांवर संकट आलेलं आम्ही दूर करणार, साहेबांसाठी आम्ही झटणार. राणांना वाटत असेल दोघजण येऊन आम्ही गपचूप जाऊ. पण आम्ही भिणार नाही. तू आमच्या समोर ये. शिवसेनेसाठी आम्ही रक्ताचं पाणी केलंय, अजून हरणार नाही. तुम्ही येऊन दाखवाच. मातोश्रीवर येऊन दाखवच. काही लोकं उद्धव साहेबांना सारखं छळतायत. त्यांना मी सांगते, आमच्या साहेबांना छळण्याऐवजी आमच्यासमोर येऊन दाखवा तुम्ही. त्यांना छळू नका. ते जनतेसाठी चांगलं काम करत आहेत. ते तुमच्यासारखी लबाडबाजी करत नाहीत.”, असंही आजीबाई म्हणाल्या.

दरम्यान, या 92 वर्षींचा मातोश्रीबाहेरील पाहारा बघता राज्याचे पर्यावरण मंत्री आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी आजींना भेटण्यासाठी बोलवलं.


हेही वाचा – ‘हा भाजपा पुरस्कृत कार्यक्रम नाही’; राणा दाम्पत्य आणि शिवसेना वादावर भाजपा नेते अतुल भातखळकरांचे स्पष्टीकरण