घरताज्या घडामोडीराज ठाकरेंच्या औरंगाबादच्या सभेबाबत गृहमंत्र्यांचं मोठं विधान, म्हणाले दोन दिवसांत...

राज ठाकरेंच्या औरंगाबादच्या सभेबाबत गृहमंत्र्यांचं मोठं विधान, म्हणाले दोन दिवसांत…

Subscribe

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या औरंगाबादमधील सभेपुढे मोठं आव्हान उभे राहिले आहेत. औरंगाबाद पोलीस आयुक्तांनी जमावबंदीचे आदेश लागू केले आहेत. तसेच राज ठाकरेंच्या १ मे रोजीच्या सभेला अद्याप परवानगी देण्यात आली नाही. यामुळे सभा होणार की नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यान सभेबाबत राज्याचे गृहमंत्री दिलीस वळसे पाटील यांनी मोठं विधान केलं आहे. सभेला परवानगी द्यायची की नाही याबाबत औरंगाबाद पोलीस आयुक्त येत्या २ दिवसांमध्ये निर्णय घेतील असे दिलीप वळसे पाटील म्हणाले आहेत.

गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या बैठकीला पवानगी मिळणार की नाही या प्रश्नाचे उत्तर दिलं आहे. या संदर्भात एक दोन दिवसांमध्ये औरंगाबाद पोलीस आयुक्त निर्णय घेतील. ते त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांशी चर्चा करत आहेत. पोलीस महासंचालकांशी चर्चा करत आहेत. यानंतर ते राज ठाकरेंच्या सभेबाबत निर्णय घेतील असे गृहमंत्री म्हणाले आहेत.

- Advertisement -

सभेला परवानगी द्यायची की नाही याबाबत पोलीस निर्णय घेतील. यामध्ये राज्य सरकारची कोणतीच भूमिका नाही. जर राज्यात कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याचा कोणी प्रयत्न केला तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असा इशारा सुद्धा पुन्हा एकदा गृहमंत्र्यांनी दिला आहे.

औरंगाबादमध्ये जमावबंदीचे आदेश

औरंगाबाद पोलीस आयुक्तांनी आजपासून औरंगाबादमध्ये शस्त्रसंधी आणि जमावबंदीचे आदेश लागू केले आहेत. पुढील ९ मेपर्यंत जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. यामुळे राज ठाकरेंची सभा होणार की नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे.

- Advertisement -

राज ठाकरेंचा २९ एप्रिलला पुणे दौरा

मनसे अध्यक्ष राज ठाकरे औरंगाबाद दौऱ्यापूर्वी पुणे दौरा करणार असल्याची माहिती समोर आली आहे. २९ एप्रिल २०२२ रोजी हा दौरा होणार आहे. पुण्यातील पदाधिकाऱ्यांशी राज ठाकरे चर्चा करणार असल्याची शक्यता आहे.

शरद पवारांची सभा होणार का? – मनसे

औरंगाबादमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांची सभा आयोजित करण्यात आली आहे. परंतु पोलीस आयुक्तांनी जमावबंदी आणि शस्त्रबंदीचे आदेश लागू करण्यात आले असल्यामुळे शरद पवार यांची सभा होणार का? असा प्रश्न मनसेकडून करण्यात आला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या सभेला अद्याप परवानगी मिळाली नसून शरद पवार यांची सभा होत असल्यामुळे मनसेकडून प्रश्न करण्यात येत आहे.


हेही वाचा : नवनीत राणांसोबत जेलमध्ये हीन वागणुकीचा प्रकार घडला नाही, गृहमंत्री वळसे पाटलांनी फेटाळला आरोप

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -