भाजपच्या आरोपानंतर राष्ट्रवादीकडून पवारांचा पूर्ण व्हिडीओ शेअर, गृहविभाग करणार कारवाई

Home Department will take action After BJP's allegation on sharad pawar video
भाजपच्या आरोपानंतर राष्ट्रवादीकडून पवारांचा पूर्ण व्हिडीओ शेअर, गृहविभाग करणार कारवाई

राष्ट्वादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा एक व्हिडीओ भाजपकडून व्हायरल करण्यात आला आहे. तसेच या व्हिडीओवरुन शरद पवारांवर टीका करण्यात आली आहे. परंतु राष्ट्रवादीकडून शरद पवारांचा तोच पूर्ण व्हिडीओ प्रसिद्ध करण्यात आला आहे. नास्तिक शरद पवार यांनी हिंदू देवी देवतांचे बाप काढालेत. पवार नेहमीच हिंदू धर्माचा द्वेष करतात अशी टीका भाजपकडून करण्यात आला आहे. परंतु अपूर्ण व्हिडीओ शेअर केल्यामुळे आता गृहविभाग भाजपवर कारवाई करण्याची शक्यता आहे. भाजपने शेअर केलेला व्हिडीओ अर्धवट असल्याचा आरोप राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कवी जवाहर राठोड यांनी लिहिलेल्या कवितेचा आशय साताऱ्याच्या सभेत सांगितला. हा आशय सांगतानाचा अर्धवट व्हिडीओ भाजपकडून शेअर करण्यात आला आहे. भाजपने व्हिडीओ ट्विट करुन म्हटलं आहे की, नास्तिक शरद पवार यांनी हिंदू देवी देवतांचे बाप काढालेत. पवार नेहमीच हिंदू धर्माचा द्वेष करतात. पवारांनी हिंदूं धर्माची बदनामी केली नसती, जातीवाद केला नसता, देवीदेवतांचा अपमान केलाच नसता, तर ते एवढे मोठे झालेच नसते असे भाजपकडून टीकास्त्र डागण्यात आले आहे. मात्र राष्ट्रवादीकडून यावर प्रत्युत्तर देण्यात आले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांची पूर्ण व्हिडीओ क्लीप व्हायरल करण्यात आली आहे. झूठ की उम्र तब तक होती है जब तक सच का सामना नहीं होता. भाजप हा अर्धवटरावांचा पक्ष आहे हे आता सर्वज्ञात आहे, पण अर्धे मुर्धे व्हिडीओ दाखवून, अर्धी कच्ची लोणकढी थाप मारून, पूर्ण सत्य लपवता येत नाही. निदान पूर्ण व्हिडीओ दाखवण्याची अर्धांश हिम्मत तरी ठेवायची होती असे राष्ट्रवादीकडून प्रत्युत्तर देण्यात आले आहे.


हेही वाचा : जनता हुशार, राजकारणी चुकल्यावर धडा शिकवते, शरद पवारांचे श्रीलंका पाकिस्तानच्या अराजकतेवर प्रतिक्रिया