घरमहाराष्ट्रनाशिकमोलकरणीनेच मारला १८ लाखांवर डल्ला; तीन जणांना न्यायालयीन कोठडी

मोलकरणीनेच मारला १८ लाखांवर डल्ला; तीन जणांना न्यायालयीन कोठडी

Subscribe

धुणीभांडी कामासाठी ११ वर्षांपासून असलेल्या मोलकरणीने व्यावसायिक मालकालाच्या घरात दोन साथीदारांच्या मदतीने १७ लाख ८४ हजार ६२५ रुपयांच्या दागिने व रोख रकमेवर डल्ला मारला. दरवाजाचे लॅचलॉक चावीने उघडल्याने व मोलकरीणीने वारंवार मालकाशी मोबाईलवर संपर्क साधत विचारपूस केल्याच्या हिंटवरुन पोलिसांनी मोलकरीण, रेकॉर्डवरील गुन्हेगारासह एकाला अटक केली. त्यांच्याकडून चोरी केलेले दागिने व रोख रक्कम जप्त केली. तिघांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने २८ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. दिपाली बाळू साठे (३३, रा. पंचशीलनगर, नाशिक), जुनेद ऊर्फ राजू चांद शेख (३८, रा. पंचशीलनगर, नाशिक), सोहेल ऊर्फ बाबू पप्पू अन्सारी (२५, रा. वडाळा,नाशिक) असे अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

- Advertisement -

वाहन स्पेअरपार्ट विक्रेते प्रीतपालसिंग बलवीरसिंग बग्गा हे कुटुंबियांसह १६ नोव्हेंबरला अमृतसरला गेले होते. ते आठ दिवसांनंतर रविवारी नाशिकला आले असता त्यांना चोरट्याने घराच्या दरवाजाचा कडी-कोयंडा तोडून व लॅचलॉक उघडल्याचे दिसले. त्यांनी घरात प्रवेश केला असता घरफोडी झाल्याचे दिसून आले. याप्रकरणी त्यांनी भद्रकाली पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी समांतर तपास सुरु केला. बग्गा यांच्या घराच्या दरवाजाचे लॅचलॉक चावीने उघडल्याने व मोलकरीणीने वारंवार मालकाशी मोबाईलवर संपर्क साधत विचारपूस केल्याचे तपासात उघडकीस आले. पोलिसांना मोलकरीण दिपाली साठेवर संशय आल्याने त्यांनी तिला चौकशीसाठी ताब्यात घेतले. तिला पोलिसी खाक्या दाखवला असता तिने जुनेद शेख व सोहेल अन्सारीच्या मदतीने गुन्हा केल्याची कबुली दिली. त्यानुसार पोलिसांनी जुनेद शेख व सोहेल अन्सारी यांना अटक केली. पोलिसांनी दिपाली साठेकडून ६ लाख दोन हजार १२५ रुपयांचे दागिने, घड्याळे व रोख रक्कम जप्त केली. जुनेद शेखकडून ३ लाख ७३ हजार ९५० रुपयांचे दागिने, घड्याळे व रोख रक्कम जप्त केली. तर, सोहेल अन्सारीकडून ४ लाख ७५ हजार ५० रुपयांचे दागिने, घड्याळे, रोख रक्कम जप्त केली. जुनेद शेख हा रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. तिघांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने २८ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -