घरमहाराष्ट्रदौंडमध्ये वातावरण कसंय..? संजय राऊतांनी उद्धव ठाकरेंना फोनवरून दिली माहिती

दौंडमध्ये वातावरण कसंय..? संजय राऊतांनी उद्धव ठाकरेंना फोनवरून दिली माहिती

Subscribe

उद्धव ठाकरे यांचा मला फोन आला. संजय दौंडमध्ये वातावरण कसंय.. मी त्यांना सांगितलंय, साहेब जोरात वातावरण आहे... कलम १४४ लावलं होतं, पण आम्ही आता ते तोडलंय.

पुण्यातील दौंडमध्ये असलेल्या भीमा-पाटस सहकारी साखर कारखान्यामध्ये कारखान्याचे चेअरमन आणि दौंडचे आमदार राहुल कूल यांनी ५०० कोटींचा घोटाळा केला असल्याचा आरोप ठाकरे गटाचे खासदार आणि प्रमुख प्रवक्ते संजय राऊत यांनी केला आहे. या प्रकरणी त्यांनी आज दौंडमधील वरवंडमध्ये या साखर कारखान्याच्या सभासदांची सभा घेतली. पण कोणताही अनुचित प्रकार या सभेमध्ये होऊ नये, यासाठी या ठिकाणी कलम 144 लावण्यात आले होते. पण तरी देखील ही सभा पार पडली. या सभेच्या माध्यमातून संजय राऊत यांनी सत्ताधाऱ्यांवर तसेच राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.

संजय राऊत हे भीमा-पाटस सहकारी कारखान्यात जाणार म्हणून या कारख्यान्याच्या परिसरात कलम 144 लावण्यात आले होते. ज्यामुळे राऊतांना त्यावेळी कारखान्याच्या परिसरात अडवण्यात आले होते. पण तरी देखील राऊत यांनी पोलिसांचा विरोध झुगारत कारखान्याच्या परिसरात असलेल्या स्व. मधुकरराव शितोळे यांच्या पुतळ्याला हार घालून अभिवादन केले. पण कलम 144 साखर कारखान्यावर कशासाठी? आम्ही कारखान्यावर कशाला निघालो, की या कारखान्याचे संस्थापक मधुकरराव शितोळे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात करावी, तर पोलिसांनी आम्हाला अडवले, मला तर 10 किमी अगोदरच अडवलं. का तर इथे 144 कलम आहे… इथे काय आम्ही दंगल करायला आलो नाही, आम्ही सांगून दंगल करतो, असे राऊत म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा – अजित पवारांबाबत रत्नागिरीच्या सभेमध्ये सविस्तर बोलणार; राज ठाकरेंकडून संकेत

दरम्यान, याबाबत ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी फोनकरून परिस्थिती जाणून घेतली, असे सांगत राऊत म्हणाले की, “उद्धव ठाकरे यांचा मला फोन आला. संजय दौंडमध्ये वातावरण कसंय.. मी त्यांना सांगितलंय, साहेब जोरात वातावरण आहे… कलम १४४ लावलं होतं, पण आम्ही आता ते तोडलंय,” त्यांच्या या माहितीनंतर उपस्थित असलेल्या लोकांनी जोरदार टाळ्या वाजविल्या.

- Advertisement -

भीमा पाटस कारखाना जोपर्यंत सुरु होऊन स्थिरस्थावर होत नाही तोपर्यंत सभासदांच्या खांद्याला खांदा लावून मी लढत राहिन. राहुल कुल यांनी भीमा पाटस कारखान्यात तब्बल 500 कोटींचा भ्रष्टाचार केलाय. दौंडच्या आजूबाजूचे कारखाने नीट चालले आहेत. अगदी दौंड-बारामती ते कर्जत जामखेडचे कारखाने व्यवस्थित सुरु आहेत मग राहुल कुल तुझाच कारखाना अडचणीत कसा आला? तू खा खा खाल्ले, असे म्हणत संजय राऊत यांनी राहुल कूल यांच्यावर टीकास्त्र डागले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -