घरक्राइमसोयीचे, पाहिजे तेच IAS, IPS अधिकारी नेमण्याचे ठाकरे सरकारचे धोरण - फडणवीस

सोयीचे, पाहिजे तेच IAS, IPS अधिकारी नेमण्याचे ठाकरे सरकारचे धोरण – फडणवीस

Subscribe

राज्याच्या पोलिस विभागात काय सुरू आहे याबाबतचा प्रश्न साकीनाक्याच्या घटनेच्या निमित्ताने तसेच राज्यात सुरू असणाऱ्या गुन्ह्यांच्या निमित्ताने पडतो. नियमबाह्य पद्धतीने होणाऱ्या बदल्यांबाबत आयएसएस आणि आयपीएस अधिकाऱ्यांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. आपल्याला सोईची आणि पाहिजे तेच अधिकारी आम्ही आणू, अशी सरकारची मानसिकता आहे. त्यामुळेच आयएएस आणि आयपीएस अधिकाऱ्यात नाराजी असल्याची प्रतिक्रिया राज्याच्या विधानसभेचे विरोधी पक्षनेता देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. मुंबईतील साकीनाका परिसरात घडलेल्या बलात्काराच्या प्रकरणानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. (IAS, IPS officers in maharashtra not happy over officer transfers & postings by mva says lop devendra fadnavis)

साकीनाक्यात घडलेला बलात्काराचा प्रकार हा मन सुन्न करणारा असा आहे. मनाला चटका लावून जाणारी ही घटना आहे. गेल्या महिन्याभरात झालेल्या बलात्काराच्या घटना होताहेत त्याकडे लक्ष घालण्याची गरज आहे. अमरावतीत १७ वर्षाच्या मुलीवर बलात्कार, पालघर, रत्नागिरी आणि पुण्यातही अशा घटना घडल्या आहेत. मुंबईला अतिशय सुरक्षित शहर म्हणून पाहिले जाते. महिलांना फिरण्याकरिता कोणतीही अडचण येत नाही. अशा प्रकारच्या घटना घडल्यास मुंबईच्या लौकिकाला धक्का पोहचतो. साकीनाक्याची घटना ही निघृण आणि माणुसकीला काळीमा फासणारी अशी घटना आहे.

- Advertisement -

मुख्यमंत्र्यांनी फास्ट ट्रॅक कोर्टात प्रयत्न करावेत

माणस इतकी पाशवी कशी होऊ शकतात असाही सवाल फडणवीस यांनी केला. त्यामुळेच आमची मागणी आहे की यासंदर्भात कुठल्याही परिस्थितीत सर्व आरोपींना अटक करावी. तत्काळ फास्ट ट्रॅक कोर्टात हे प्रकरण न्यावे. या प्रकरणातील नराधमांना फाशीच झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे. सध्या पोलिस विभागात काय सुरू आहे, याबाबतची विचारण करण्याची गरज आहे. शक्ती कायद्याबाबत बैठकांवर बैठका सुरू आहेत. आजच्या कायद्यातही फास्ट ट्रॅक केसेस चालवू शकतो. स्वतः मुख्यमंत्र्यांनी मुख्य न्यायमूर्तींकडे मागणी करत फास्ट ट्रॅक कोर्टात ही केस चालवावी अशी मागणी फडणवीस यांनी केली.

IAS, IPS बदल्यांमुळे नाराजी

महिला आयोगाबाबत अनेकवेळा न्यायालयाने सरकारला निर्देश दिले आहेत. सरकारने अनेकवेळा आश्वासन दिले आहे. पण सरकारला फुरसत नाही, की ते महिला आयोगाला अध्यक्ष देतील, असेही फडणवीस म्हणाले. इतक्या सातत्याने महिलांवर अत्याचाराच्या घटना घडण हे महाराष्ट्राला शोभणार नाहीए. अशा घटना वारंवार घडत गेल्या तर असुरक्षिततेची भावना निर्माण होते. पोलिसांमध्येही काही प्रमाणात नाराजी दिसली आहे. बदल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात काय परिस्थिती झाली त्याची सीबीआय चौकशी करत आहे. अनेक आयपीएस अधिकाऱ्यांनी या बदल्यांमध्ये सुरू असलेली नियमबाह्य पद्धतीवर नाराजी व्यक्त केली आहे. आम्हाला पाहिजे तेच अधिकारी आम्ही आणू, सोयीचे अधिकारी आणू, आमच्या व्यवहारांना संरक्षण देऊ अशी जर मानसिकता असेल तर गुन्हेगाराला संरक्षण मिळते. तसेच गुन्हेगार बेफान होतात अशीही टीका त्यांनी केली. बदल्यांच्या निमित्ताने निश्चितच नाराजी आहे.

- Advertisement -

अनेक स्टेट केडरमधील ज्युनिअर लोक महत्वाच्या ठिकाणी आणले जात असल्याबाबतची आयएएस अधिकाऱ्यांनी नाराजी बोलून दाखवली आहे. तसेच अनेक ठिकाणी राज्यनिहाय आयएएस प्रमाण राखले जात नसल्याबाबतही नाराजी आहे. काही अनुभवी आयएएस अधिकाऱ्यांना बाजूला केल्यासाठीही नाराजी व्यक्त झाल्याचे फडणवीस यांनी सांगितले.


हेही वाचा – Mumbai Sakinaka Rape : दीशा, शक्ती कायदा कुठेय ? दरेकरांचा सवाल


 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -