घरमहाराष्ट्रआंचल गोयलच परभणीच्या जिल्हाधिकारी; पालकमंत्री नवाब मलिकांची माहिती

आंचल गोयलच परभणीच्या जिल्हाधिकारी; पालकमंत्री नवाब मलिकांची माहिती

Subscribe

डॅशिंग आयएएस अधिकारी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आंचल गोयल याच परभणीच्या जिल्हाधिकारीपदी असतील अशी माहिती अल्पसंख्यांक मंत्री आणि परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री नवाब मलिक यांनी दिली. दोन दिवसांपूर्वी त्या जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार स्वीकारणार होत्या. मात्र, अचानक त्यांची बदली करण्यात आल्याच्या चर्चा सुरु होत्या. अखेर आंचल गोयल याच परभणीच्या जिल्हाधिकारी पदी असणार असल्याचं नवाब मलिक यांनी स्पष्ट केलं.

परभणीचे जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर ३१ जुलै रोजी सेवानिवृत्त झाले. त्यानंतर परभणीच्या जिल्हाधिकारी म्हणून आंचल गोयल यांची नियुक्ती करण्यात आली. त्यादिवशी त्या पदभार स्वीकारणार होत्या. मात्र, सामान्य प्रशासन विभागाने त्यांना पदभार घेऊ नका असं सांगितलं. त्यानंतर ही नियुक्ती थांबवण्यात पालकमंत्र्यांची नावं आली होती, असं नवाब मलिक यांनी सांगितलं. दरम्यान, आज मुख्यमंत्र्यांशी चर्चा करुन निर्णय घेतला की आंचल गोयलच परभणीच्या जिल्हाधिकारीपदी असतील. आंचल गोयल यांना रितसर तिथले अतिरिक्त जिल्हाधिकारी त्यांना पदभार देतील, असं मलिक यांनी सांगितलं.

- Advertisement -

नेमकं प्रकरण काय आहे?

आंचल गोयल यांची परभणी जिल्हाधिकारी पदी नियुक्ती होताच परभणी जिल्ह्यातील सत्तारुढ पक्षाचे काही नेते मंडळींनी सरकार दरबारी स्वतःची प्रतिष्ठा पणास लावली. थेट मंत्रालयात धाव घेत आंचल गोयल यांना पदभार घेण्यापासून दूर ठेवण्याचे प्रयत्न झाल्याचे बोलले जात आहे. त्यानंतर आंचल गोयल यांच्याऐवजी अतिरिक्त जिल्हाधिकारी राजेश काटकर यांच्याकडे जिल्हाधिकारी पदाचा पदभार द्यावा, असे आदेश शनिवारी सायंकाळी सामान्य प्रशासन विभागाचे सहसचिव अजित पाटील यांनी जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांना दिले. मुगळीकर यांनी आपला पदभार राजेश काटकर यांच्याकडे सोपवून निवृत्ती घेतली.

दरम्यान, आंचल गोयल यांनी जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार स्वीकारावा म्हणून परभणीच्या जागरुक नागरिक आघाडीने आंदोलन छेडलं होतं. आंचाल गोयल यांना पदभार देण्यात यावा अशी मागणी आंदोलकांनी केली होती.

- Advertisement -

हेही वाचा – राज्यपालनियुक्त १२ आमदारांचा निर्णय कोश्यारी रद्द करु शकत नाही – नवाब मलिक


 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -