घरदेश-विदेशआयसीएसई बोर्डाच्या दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर

आयसीएसई बोर्डाच्या दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर

Subscribe

आयसीएसई दहावी बोर्ड परीक्षेचा एकूण निकाल 99.97 टक्के इतका लागला आहे. तसेच, आयसीएसई दहावी बोर्डाच्या परीक्षेत महाराष्ट्रचा 100 टक्के निकाल लागला आहे.

आयसीएसई दहावी बोर्ड (ICSE Board Result 2022) परीक्षेचा निकाल अखेर जाहीर झाला आहे. मागिल काही दिवसांपासून विद्यार्थी निकालाची आतुरतेने वाट पाहत होते. आयसीएसई दहावी बोर्ड परीक्षेचा एकूण निकाल 99.97 टक्के इतका लागला आहे. (icse 10th board result announced declared four students top rank with 99 8 percent marks)

आयसीएसई दहावी बोर्डाच्या परीक्षेत महाराष्ट्रचा 100 टक्के निकाल लागला आहे. विशेष म्हणजे पुण्याचा हरगुण कौर माथरू देशात पहिला आहे. तसेच, आयसीएसई दहावी बोर्डाच्या परीक्षेत दरवर्षीप्रमाणे यंदाच्याही निकालात मुलींनी बाजी मारली आहे.

- Advertisement -

चार विद्यार्थ्यांनी पहिला क्रमांक पटकवला

यावर्षी 99.98 टक्के मुली उत्तीर्ण झाल्या होत्या. तसेच, 99.97 टक्के मुले उत्तीर्ण झाले आहेत. आयसीएसई दहावी बोर्ड परीक्षेत देशातून चार विद्यार्थ्यांनी पहिला क्रमांक पटकवला आहे. दरम्यान, 2 लाख 31 हजार 063 मुलांनी देशभरातून परीक्षा दिली होती.

- Advertisement -

महाराष्ट्रातून 26 हजार 083 विद्यार्थ्यांनी आयसीएसई दहावी बोर्ड परीक्षा दिली होती. या विद्यार्थ्यांपैकी देशभरातून 1 लाख 25 हजार 678 मुले आणि 1 लाखल 05 हजार 385 मुली उत्तीर्ण झाल्याची माहिती समोर येत आहे.

आयसीएसई दहावी बोर्डाची (ICSE Board) परीक्षा दोन सत्रात झाली होती. पहिल्या सत्राची परीक्षा नोव्हेंबर-डिसेंबर 2021 मध्ये तर दुसऱ्या सत्राची परीक्षा एप्रिल-मे 2022 मध्ये झाली होती. आता या दोन्ही परीक्षांना समान वेटेज देऊन अंतिम निकाल जाहीर करण्यात आला आहे.

इथे पाहा निकाल

  • विद्यार्थी आयसीएसई बोर्डाच्या https://results.cisce.org/ या अधिकृत वेबसाईटवर निकाल पाहू शकतील.
  • यासाठी वेबसाईटवर ICSE Board Result 2022 या लिंकवर क्लिक करा.
  • येथे तुमचा युनिक आयडी आणि क्रमांक प्रविष्ट करा.
  • तुम्हाला निकाल पाहता येईल.

तुम्ही SMS द्वारेही निकाल पाहू शकता

यासाठी तुम्हाला ICSE<Space><Unique Id> हा मेसेज 09248082883 या क्रमांकावर पाठवा. यानंतर तुमच्या मोबाईलवर एसएमएसद्वारे तुम्हाला निकाल पाहता येणार आहे.


हेही वाचा – उद्धव ठाकरेंनी सत्तासंघर्षादरम्यान फडणवीसांना फोन केला नाही, शिवसेनेने फेटाळली चर्चा

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -