घरमहाराष्ट्रभुजबळांनी शिवसेना सोडली नसती तर ते आधीच मुख्यमंत्री झाले असते, उद्धव ठाकरेंची...

भुजबळांनी शिवसेना सोडली नसती तर ते आधीच मुख्यमंत्री झाले असते, उद्धव ठाकरेंची कोपरखळी

Subscribe

मुंबई – छगन भुजबळ यांच्या अमृत महोत्सवानिमित्त मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात अमृत महोत्सव सोहळ्याचं आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी तुफान फटकेबाजी केली. भुजबळ साहेबांनी शिवसेना सोडली नसती तर ते आधीच मुख्यमंत्री झाले असते, असं वक्तव्य करत ठाकरेंनी कोपरखळी लगावली. तसंच, सरकार वाचवण्यात ते वाकबगार असल्याचंही कौतुकद्गार त्यांनी केले.

छगन भुजबळ यांनी शिवेसना सोडून राष्ट्रवादीचे घड्याळ हाती बांधले. तेव्हापासून त्यांची शिवसेनेसोबत खडाजंगी अवघ्या महाराष्ट्राने पाहिली. मात्र, आता अडीच-तीन वर्षांपूर्वी महाविकास आघाडी सत्ते आल्यानंतर छगन भुजबळ यांची शिवसेनेसोबत जवळकी वाढली आहे. आणखी चार महिने थांबलो असतो तर मीच मुख्यमंत्री झालो असतो असं आज छगन भुजबळ या कार्यक्रमात म्हणाले. त्यांना प्रत्युत्तर देताना उद्धव ठाकरे यांनी आणखी एक मोठा गौप्यस्फोट केला आहे.

- Advertisement -

तुम्ही चार महिन्याचं काय म्हणता. उलट भुजबळ साहेबांनी शिवसेना सोडली नसती तर ते आधीच मुख्यमंत्री झाले असते, असं उद्धव ठाकरे म्हणाले. सरकार वाचवण्यात ते वाकबगार. तुम्ही शिवसेना सोडलीत तेव्हा सर्वांत पहिला मोठा कौटुंबिक धक्का बसला. माँनाही धक्का बसला. राग वगैरे नंतरचा भाग, पण आपला माणूस हा जाऊ शकतो हा मोठा धक्का होता. त्यातून सावरताना मानसिकदृष्टच्या आम्हाला वेळ लागला. पण बाळासाहेब असतानाच तुम्ही मिटवून टाकलंत ते चांगलं केलं. घरी आलात, बाळासाहेबांनी तुमचं स्वागत केलं. मतभेद मिटवून टाकले, ते चांगलं झालं. माँ असती तर आणखी बरं झालं असतं, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

वय वाढलं तरी मन तरुण असावं लागतं. तरुण मनात ईर्ष्या असावी लागते. छगन भुजबळांना दोन नायक भेटले. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार. आयुष्यात दोन उत्तुंग व्यक्तीमत्त्व त्यांना लाभली. या दोन्ही नायकांचा त्यांनी कधी दुरुपयोग केला नाही. स्वतःची वाटचाल करत त्यांनी दिशा ठरवली म्हणून तुम्ही तरुण आहात, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

- Advertisement -

मैदानात या

प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टात जावं लागतं. दसरा मेळावा मैदानात व्हावं म्हणून कोर्टात गेलो. हिंमत असेल तर मैदानात या. माझी तयारी आहे. मी मैदानात उतरलो आहे, आम्हाला मैदान कसं मिळणार नाही याचा प्रयत्न केला. यापेक्षा एका व्यासपीठावर या आणि मग होऊन जाऊदेत काय व्हायचं ते.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -