घरमहाराष्ट्रराज ठाकरेंच्या अल्टिमेटमवर प्रशासनाची तत्काळ कारवाई, माहिममधील अतिक्रमणावर हातोडा

राज ठाकरेंच्या अल्टिमेटमवर प्रशासनाची तत्काळ कारवाई, माहिममधील अतिक्रमणावर हातोडा

Subscribe

मुंबई – येत्या महिन्याभरात माहिमच्या खाडीवर बांधलेले अनधिकृत बांधकाम हटवले नाही तर त्याबाजूलाच सर्वांत मोठं गणपती मंदिर बांधू, असा सज्जड दम महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल जाहीर भाषणात दिला. त्यांच्या अल्टिमेटला १२ तासही पूर्ण होत नाहीत तोवर मुंबई महापालिका प्रशासन अॅक्शन मोडवर आली असून त्यांनी वेगाने कारवाईला सुरुवात केली आहे. दरम्यान, मुंबई पालिकेने पोलिसांच्या संरक्षणात अतिक्रमणावर हातोडा मारण्यात आला असून त्यावरील हिरवा झेंडाही काढण्यात आला आहे.


गुढीपाडव्यानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची शिवाजी पार्कात भव्य जाहीर सभा झाली. या सभेत राज ठाकरेंनी जनतेला संबोधले. यावेळी त्यांनी विविध राजकीय मुद्दे छेडल्यानंतर त्यांनी एक व्हिडीओ दाखवला. या व्हिडीओमध्ये माहिमच्या खाडीवर अनधिकृत मजार बांधली असल्याचा पुरावाच त्यांनी दाखवला. तसंच हे अनधिकृत बांधकाम गेल्या दोन वर्षांत बांधले गेले असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे हे अतिक्रमण येत्या महिन्याभरात हटवले नाही तर त्याबाजुलाच सर्वांत मोठं गणपती मंदिर बांधलं जाईल, असा अल्टिमेटम राज ठाकरे यांनी दिला.

- Advertisement -

हेही वाचा – MNS GudhiPadwa Rally : राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल, भाजपवर मात्र मौन

राज ठाकरेंचं भाषण झाल्यास अद्याप १२ तासही उलटले नाहीत. मात्र, मुंबई महापालिका आणि इतर यंत्रणा तत्काळ कार्यान्वित झाल्या आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी अनधिकृत बांधकाम पाडण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार, हे बांधकाम जमीनदोस्त करण्यात आलं आहे. राज ठाकरेंनी आरोप केल्यानंतर माहिम खाडीकिनारी पोलिसांचा चोख बंदोबस्त करण्यात आला होता. अधिकाऱ्यांकडून पाहणी सुरू केल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने या अतिक्रमणावर हातोडा चालवण्यात आला.

- Advertisement -

हेही वाचा – ‘मी उद्धवला म्हटलं चल माझ्यासोबत….’ राज ठाकरेंनी सांगितला २००३ चा प्रसंग

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -