घरताज्या घडामोडीमुंबईत रात्री ९ वाजेपर्यंत २२,२४९ मूर्तींचे विसर्जन, तर विसर्जनात ३,८०६ गौरींचा समावेश

मुंबईत रात्री ९ वाजेपर्यंत २२,२४९ मूर्तींचे विसर्जन, तर विसर्जनात ३,८०६ गौरींचा समावेश

Subscribe

मुंबईत गणेश चतुर्थीला आगमन झालेल्या गणरायाचे आज सहाव्या दिवशी नैसर्गिक व कृत्रिम तलाव या विसर्जन स्थळी नाशिक ढोलाच्या तालावर वाजतगाजत मिरवणूक काढून उत्साहात विसर्जन करण्यात आले. सोमवारी सकाळपासूम विसर्जनाला सुरुवात झाली. दुपारनंतर विसर्जन वाढू लागले. रात्री ९ पर्यंत एकूण २२,२४९ गणेशमूर्तीचे व ३,८०६ गौरींचे विधिवत विसर्जन करण्यात आले. यामध्ये, ८५ सार्वजनिक गणेशमुर्तीं व २२,१६४ घरगुती गणेश मूर्तींचा समावेश होता.

मुंबईत ३१ ऑगस्ट रोजी गणेश चतुर्थीला श्रीगणरायाचे मोठ्या धुमधडाक्यात आगमन झाले होते. त्यानंतर प्रथम दीड दिवसांच्या व नंतर पाच दिवसांच्या गणरायांचे विसर्जन करण्यात आले. त्याला मुंबईकरांनी चांगला प्रतिसाद दिला. मात्र त्या तुलनेत सहा दिवसांच्या गणेश मूर्तींची संख्या प्रारंभी कमी होती. मात्र नंतर त्यात वाढ होत गेली. दीड व पाच दिवसांच्या गणरायासोबत हरतालिकांचे विसर्जन करण्यात आले. तर आता सहा दिवसांच्या गणेशासोबत गौरींचेही भावपूर्ण वातावरणात विधीवत विसर्जन करण्यात आले.

- Advertisement -

गणेश भक्तांनी नैसर्गिक व कृत्रिम तलाव या विसर्जन स्थळी गणेश विसर्जनाला काहीशी गर्दी केली होती. मुंबई महापालिका व पोलीस यांनी विसर्जन निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी चांगली तयारी केली होती. दादर, जुहू, गिरगाव आदी चौपाटीवर गणेश विसर्जन निर्विघ्नपणे होण्यासाठी पालिका यंत्रणा चांगलीच कामाला लागल्याचे दिसून आले. पालिकेने चौपाटी, तलाव, खाडी आदी परिसरात विसर्जनाला निर्माण झालेल्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी उंच मनोरे उभारले होते.

मोबाईल टॉयलेट, वैद्यकीय कक्ष, निर्माल्य कलश, पिण्याचे पाणी, रुग्णवाहिका, प्रकाश योजना आदी चांगली तयारी करण्यात आली होती.सुदैवाने आतापर्यंत पार पडलेल्या विसर्जन सोहळ्याप्रसंगी कोणतीही दखल घेण्यासारखी मोठी दुर्घटना घडलेली नसल्याचे प्रशासनाकडून समजते.

- Advertisement -

असे झाले गणेश विसर्जन

मुंबईत रात्री ९ वाजेपर्यंत सहा दिवसांच्या एकूण २२,२४९ गणेशमूर्तीं व ३,८०६ गौरींचे विसर्जन करण्यात आले. यामध्ये, सार्वजनिक ८५ सार्वजनिक गणेशमूर्तींचा व २२,१६४ घरगुती गणेशमूर्तींचा समावेश आहे.

एकूण गणेश विसर्जनात नैसर्गिक विसर्जन स्थळी 

५१ सार्वजनिक गणेशमूर्तींचे व १३,३९४ घरगुती मूर्तीं अशा एकूण १३,४४५ मूर्तींचे विसर्जन झाले. तसेच, २,४५६ गौरींचेही विसर्जन करण्यात आले. त्याचप्रमाणे, एकूण गणेशमूर्ती विसर्जनात कृत्रिम तलावात विसर्जित ८,८०४ गणेशमूर्तींचा समावेश आहे. त्यामध्ये, ३४ सार्वजनिक गणेश मूर्तींचा तर ८,७७० घरगुती मूर्तींचा समावेश आहे. तसेच, १,३५० गौरींचेही विसर्जन करण्यात आले.


हेही वाचा : उद्धव ठाकरेंनी बीकेसी किंवा इतर ठिकाणी दसरा मेळावा घ्यायला हरकत नाही, रामदास आठवलेंचा सल्ला


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -