घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रIMPACT खरेंचे खोटे कारनामे : जिल्हा बँक बेकायदेशीर निधी ऑडिओ क्लिप; पिंगळे,...

IMPACT खरेंचे खोटे कारनामे : जिल्हा बँक बेकायदेशीर निधी ऑडिओ क्लिप; पिंगळे, पाटील सक्तीच्या रजेवर

Subscribe

नाशिक : लाचखोर खरेच्या खोट्या कारनाम्यांमधून उघडकीस आलेल्या जिल्हा मध्यवर्ती बँकेतील गटसचिवांच्या बेकायदेशीर निधीप्रकरणी ‘माय महानगर’च्या दणक्याने मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेश पिंगळे आणि तत्कालीन अध्यक्ष केदा आहेर यांचे स्वीय सहाय्यक वाय. के. पाटील यांना प्रशासकांनी सक्तीच्या रजेवर पाठवले आहे. गटसचिवांच्या निधीतील अपहारासंबंधी पिंगळे आणि पाटील यांच्या संभाषणाची ऑडिओ क्लिप प्रसिद्ध होताच, प्रशासकांनी दोघांविरुद्ध कारवाई केली आहे. दरम्यान, या दोघांवरील कारवाईमुळे बँक कर्मचार्‍यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. त्यांच्यावर आता गुन्हे कधी दाखल होणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

जिल्हा मध्यवर्ती बँकेत झालेल्या गटसचिवांच्या निधीतील अपहाराचा ‘माय महानगर’ने सातत्याने पाठपुरावा केला आहे. या अपहाराच्या संदर्भातील सुरुवातीपासून झालेल्या घडामोडींचा विस्तृत लेखाजोखा मांडून या प्रकरणाला वाचा फोडली. लाचखोर जिल्हा उपनिबंधक सतीश खरेने केलेल्या अनेक गैरकारभारांपैकी गटसचिवांचा निधीचा अपहार हे मोठे प्रकरण आहे. या अपहाराच्या संबंधित चौकशीची जबाबदारी खरेवर आल्यानंतर त्याने हे प्रकरण दाबून टाकले होते.

- Advertisement -

मात्र, लाचखोरीच्या प्रकरणात खरेला अटक झाल्यानंतर याप्रकरणाची मोठ्या प्रमाणात चर्चा झाली. या प्रकरणातील तक्रारदार महेंद्र काटकर आणि उदयकुमार आहेर यांनी २०२१ मध्ये सहकार विभागाकडे अनेक तक्रारी केल्या होत्या. मात्र, या विभागाने केवळ कारवाईचा फार्स केला. कागदी घोडे नाचवले. प्रत्यक्षात, वर्ष उलटूनही दोषिंविरुद्ध कोणतीही कारवाई झाली नाही. या प्रकरणाचा मास्टर माईंड सतीश खरेच होता. त्याच्याच वरदहस्ताने एम.डी. शैलेश पिंगळे आणि वादग्रस्त पी. ए. वाय. के. पाटील यांनी राजरोसपणे बँकांच्या शाखेतून बेकायदेशीर पद्धतीने पैसे काढले.

या प्रकरणी ‘माय महानगर’ने सातत्याने पाठपुरावा केला. यातील सर्वात महत्वाचा पुरावा म्हणजे या दोघांचे संभाषण असलेली ऑडिओ क्लिप. ही क्लिप ‘माय महानगर’वर प्रसिद्ध केल्यानंतर प्रशासनाला जाग आली. ऑडिओ क्लिपमुळे या अपहारातील दोघांचा सहभाग स्पष्ट झाल्यानेच त्यांच्या विरुद्ध सक्तीच्या रजेची कारवाई करण्यात आली. दरम्यान, प्रशासकांनी केलेल्या कारवाईचे बँकेतील कर्मचार्‍यांकडून स्वागत करण्यात आले आहे. केवळ सक्तीची रजा नको, तर प्रकरणाच्या मुळाशी जाऊन दोषींविरुद्ध गुन्हे दाखल करण्याची मागणी पुढे आली आहे.

गटसचिवांच्या कथीत अपहार प्रकरणासंदर्भात ‘माय महानगर’च्या वृत्ताची दखल घेत शैलेश पिंगळे आणि वाय. के. पाटील यांना सक्तीच्या रेजवर पाठवले आहे. : प्रतापसिंग चव्हाण, प्रशासक, जिल्हा मध्यवर्ती बँक

- Advertisement -

शैलेश पिंगळे ठरले वादग्रस्त

मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेश पिंगळे यांच्याविरुद्ध गैरकारभाराचे अनेक आरोप आहेत. महिलांच्या बाबतीत केलेले गैरवर्तन, स्वॉफ्टवेअर कंपनीशी केलेला करार, कंपनीला डिपॉझिट परत देण्यासाठी केलेली तडजोड, शेतात द्राक्ष पिक नसतानाही घेतलेले बेकायदेशीर पिक कर्ज, दिंडोरी आणि त्र्यंबक तालुक्यातील संचालकांना कारवाईपासून दिलेले अभय, बँक डबघाईत असताना वसुलीसाठी निष्क्रियता असे एक ना अनेक प्रकरणांमध्ये शैलेश पिंगळे यांची भूमिका वादग्रस्त ठरली आहे. या बाबत सहकार आयुक्तांकडे तसेच विभागीय निबंधकांकडे अनेक तक्रारी करण्यात आल्या आहेत. मात्र, पिंगळेंविरुद्ध कुठलीही कारवाई झालेली नाही.

एनडीसीसी बँकेतील गटसचिवांच्या निधीचा अपहाराचा सबळ पुरावा असलेली ऑडिओ क्लिप माय महानगरच्या हाती लागली आहे. ही क्लिप ऐकण्यासाठी बाजूचा कोड स्कॅन करा किंवा खालील लिंकवर क्लिक करा
https://fb.watch/kP7J9lW_28/

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -